Trending News: 'या' ठिकाणी चक्क 'चुंबन' विकतात तरुणी; रस्त्याच्या बाजूलाच सुरू केलं दुकान
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Trending News: 'या' ठिकाणी चक्क 'चुंबन' विकतात तरुणी; रस्त्याच्या बाजूलाच सुरू केलं दुकान

Trending News: 'या' ठिकाणी चक्क 'चुंबन' विकतात तरुणी; रस्त्याच्या बाजूलाच सुरू केलं दुकान

Updated Jul 29, 2024 05:03 PM IST

Kiss and Hugs Stalls News: रस्त्याच्या कडेला चुंबन आणि मिठीचा स्टॉल सुरु करणाऱ्या तरुणींबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

चुंबनाचा स्टॉल सुरू करणाऱ्या तरुणी चर्चेत
चुंबनाचा स्टॉल सुरू करणाऱ्या तरुणी चर्चेत

Viral Story: रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवर वर्तमानपत्रे, शूज, चप्पल, कपडे आणि खाद्यपदार्थ यांसारख्या वस्तू विकताना आपण नेहमीच पाहतो. परंतु, कोणाला चुंबन किंवा मिठी विकताना कधी पाहिलेत का? मात्र, चीनमध्ये काही तरुणी मिठी मारणे आणि चुंबन विकत असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, यासंदर्भातील काही फोटो व्हायरल झाली आहेत, ज्यामुळे इंटरनेट वेगळीच चर्चा सुरू झाली.

तरुणींनी रस्त्याच्या बाजूला स्टॉल लावून मिठी आणि चुंबनाची विक्री सुरू केल्याची सांगितले जात आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, एका मुलीने शेनझेनजवळ एक स्टॉल लावला आहे. एक तरुणी मिठीसाठी १ युआन, चुंबनासाठी १० युआन, एकत्र चित्रपट पाहण्यासाठी १५ युआन आकरत आहे. इतर दोन महिलांनी घरातील कामात मदत करण्यासाठी २० युआन आणि सोबत दारू पिण्यासाठी प्रतितास ४० युआन असे पोस्टर लावले आहेत. एकीकडे सोशल मीडियावर काही लोक याला तणाव दूर करण्याचा आणि संवाद साधण्याचा मार्ग म्हणत आहेत. पंरतु, यामुळे महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, असे काहींचे मत आहे. एका व्यक्तीने म्हटले आहे की, हे बेकायदेशीर असू शकते. तरुणींनी स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

स्थानिक वकिलांनी याबाबत चिंता व्यक्त केली. स्ट्रीट गर्लफ्रेंड सेवा सध्या कायद्याच्या चौकटीबाहेर कार्यरत आहे. लवकरच त्याचे वेश्याव्यवसायात रुपांतर होण्याची शक्यता आहे. समाजातील सर्व घटकांनी तरुणांना त्यांच्या सामाजिक आणि भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी सामान्य सामाजिक संवादाच्या निरोगी मार्गांबद्दल शिक्षित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

महिलेने अवघ्या १० सेकंदात पकडला साप, व्हिडिओ व्हायरल

एका महिलेचा साप पकडतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओत महिला संगणक केबल दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. पण काही सेकंदात साप बाहेर काढते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. @moronhumor या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दीड मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये संगणकाच्या मागे पुस्तकांच्या खाली साप लपलेला दिसतो. तेवढ्यात एक महिला येते आणि काही सेकंदातच सापाला पकडून पिशवीत टाकले. तसेच साप दिसल्यास काय खबरदारी घ्यावी? हे देखील सांगते. हा व्हिडिओ आतापर्यंत ३० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही लोक म्हणतात, ही महिला पुरुषांपेक्षा धाडसी निघाली. नाहीतर काही महिला झुरळांना देखील घाबरतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर