मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Stray dogs kill toddler in Hyderabad : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली ठार; हैदराबाद येथील घटना!

Stray dogs kill toddler in Hyderabad : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली ठार; हैदराबाद येथील घटना!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 14, 2024 01:56 PM IST

Stray dogs kill toddler in Hyderabad : हैदराबाद (Hyderabad News) येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाला. नागरिकांनी भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली ठार; हैदराबाद येथील घटना!
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली ठार; हैदराबाद येथील घटना! (HT_PRINT)

Stray dogs kill toddler in Hyderabad : हैदराबाद (Hyderabad News) येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाला. नागरिकांनी भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, या घटनेत लहान मुलीचा मृत्यू झाल्याने नागरिक संतत्प झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

BJP Manifesto: मोदींची गॅरंटी! तीन कोटी नवीन घरे, शून्य वीज बिल; भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकी कोणती आश्वासने? वाचा

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना हैदराबादच्या गायत्रीनगर येथे घडली. दीपाली (वय २ वर्ष ६ महीने) असे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दिपालीचे आई वडील हे मूळचे छत्तीसगड येथील रहिवासी असून हे कुटुंब रोजगारासाठी हैदराबादला येथे आले होते. येथील भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत येथील स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करण्या ऐवजी दुर्लक्ष केल्याने लहान मुलीचा बळी गेला, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

Loksabha Election : महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही ठिकाणी मतदान करतात १४ गावातील ४ हजार मतदार! नेमकं प्रकरण काय ? वाचा

हैदराबादच्या गायत्री नगरमध्ये दीपाली हीचे आई-वडील काम करत असतात. या ठिकाणी एका पत्राच्या खोली बाहेर बांधकाम साइट समोर बहिणीसोबत खेळत असलेल्या अडीच वर्षांच्या दीपालीवर दोन भटक्या कुत्र्यांनी शुक्रवारी हल्ला केला. कुत्र्यांनी तिला चावा घेतल्याने दीपाली ही गंभीर जखमी झाली. तिला स्थानिक नागरिकांनी जखमी चिमुरडीला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारा दरम्यान, शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. स्थानिकांनी वेळीच कुत्र्यांना पळवून घाबरवल्याने मोठी बहीण सुखरूप बचावली, असे पोलिसांनी सांगितले.

Iran Israel War : इराणचा इस्रायलवर भीषण हल्ला! तब्बल २०० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले! युद्धाचा भडका उडणार

छत्तीसगडमधील हे कुटुंब पाच महिन्यांपूर्वी हैदराबादला रोजगारासाठी आले होते. मृत मुलीचे आई-वडील दोघेही रोजंदारी करतात. हैदराबाद येथे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांमुळे येथील नागरिक दहशतीत आहेत. मात्र पालिका अधिकारी आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरीकांनी त्यांच्या तक्रारी पोलिसांना आणि पालिका अधिकाऱ्यांकडे पाठवल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग