सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट! तोडफोड-जाळपोळ व हिंसाचार, पोलिसांनी केला लाठीचार्ज-stones thrown at ganesh pandal in surat gujarat six arrested ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट! तोडफोड-जाळपोळ व हिंसाचार, पोलिसांनी केला लाठीचार्ज

सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट! तोडफोड-जाळपोळ व हिंसाचार, पोलिसांनी केला लाठीचार्ज

Sep 09, 2024 10:35 AM IST

Surat news : सुरतच्या सय्यदपुरा येथील गणेश पूजा मंडपात दगडफेक, प्रचंड तोडफोड आणि गोंधळामुळे जातीय तणाव निर्माण झाला आहे. आतापर्यंत या प्रकरणी ३३ जणांना अटक करण्यात आली आहे

सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट! तोडफोड-जाळपोळ व हिंसाचार पोलिसांनी केला लाठीचार्ज
सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट! तोडफोड-जाळपोळ व हिंसाचार पोलिसांनी केला लाठीचार्ज (PTI)

Surat news : देशभरात गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह सुरू असताना सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. सूरत येथील सैयदपुरा भागात एका गणपती मंडळावर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण झालं आहे. समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे भाविक संतप्त झाले असून दगडफेक करणाऱ्या तरुणाला पकडून भाविकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ३३ जणांना अटक केली आहे. यात दगडफेक करणाऱ्या ६ आरोपींचा समावेश आहे. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गुजरातमधील सूरतमधील सय्यदपुरा भागातील गणेश मंडळाच्या पंडालवर काही अल्पवयीन मुलांनी दगडफेक केल्याने शहरात जातीय तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या सहाही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, इतर २७ जणांनाही अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकांच्या संतप्त जमावाने परिसरात प्रचंड तोडफोड आणि गोंधळ घातला. या मुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

सुरत जिल्ह्यातील सय्यदपुरा भागात आज सोमवारी पहाटे काही अल्पवयीन मुलांनी गणेश पूजा पंडालवर दगडफेक केली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. यानंतर हजारो स्थानिक नागरिकांनी स्थानिक पोलिस ठाणे गाठून आरोपींवर कारवाईची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचाही वापर केला. या प्रकरणाची माहिती मिळताच गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पोलिसांना या घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

हर्ष संघवी यांनी सोमवारी सांगितले की, सुरतच्या सय्यदपुरा भागातील गणेश पंडालवर ६ जणांनी दगडफेक केली आणि या सर्वांना पकडण्यात आले आहे. मंत्र्यांनी सांगितले की, पोलिसांनी अशा घटनांना प्रवृत्त करणाऱ्या इतर २७ लोकांनाही अटक केली आहे.

एएनआयशी बोलताना हर्ष संघवी म्हणाले, "सुरतच्या सय्यदपुरा भागातील गणेश पंडालवर ६ जणांनी दगडफेक केली होती. या सर्व ६ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अशी घटना घडवून आणणाऱ्या इतर २७ जणांनाही अटक केली आहे." सुरत शहरातील शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, ज्यांनी गणेश पंडालवर दगडफेक केली आणि दर्शन घेण्यापूर्वीच येथे तणाव निर्माण केला अशांवर कठोर कारवाई केली जाईल.

या घटनेबाबत बोलताना सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी एएनआयला सांगितले की, "काही मुलांनी गणेश पंडालवर दगडफेक केली होती, त्यानंतर हाणामारी झाली. पोलिसांनी त्या मुलांना ताबडतोब पांगवले. पोलिसांनी तात्काळ लाठीचार्जही केला. परिसरात सुमारे हजार पोलिस तैनात करण्यात आले आहे.

Whats_app_banner
विभाग