Donald Trump on Pope : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणांवर टीका करणारे पोप फ्रान्सिस यांनी कडाडून टीका केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितांच्या धोरणाला "मोठे संकट" असं संबोधलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर ट्रम्प सरकारने पोप यांना उत्तर दिलं आहे. पोप फ्रान्सिस यांनी कॅथोलिक चर्चशी संबंधित धोरणांवर जास्त लक्ष द्यावे, असे अमेरिकेचे सीमा सुरक्षा अधिकारी जायर होमन यांनी म्हटलं आहे.
पोप फ्रान्सिस यांनी अमेरिकेच्या बिशपांना लिहिलेल्या पत्रात ट्रम्प सरकारच्या स्थळांतरितांच्या धोरणांवर टीका केली आहे. संकटात सापडलेल्या नागरिकांना देशाबाहेर काढल्याने स्थलांतरितांच्या "प्रतिष्ठेला धक्का बसतो" व त्यामुळे अनेक नागरिक असुरक्षित आणि निराधार होऊ शकतात, असे पोप यांनी म्हटलं होतं. एवढच नाही तर, मी कॅथोलिक चर्चच्या सर्व भक्तांना व सद्भावना असलेल्या सर्व पुरुष आणि महिलांना आग्रह करतो की त्यांनी स्थलांतरित आणि निर्वासित बंधूभगिनींशी भेदभाव करणाऱ्या व त्यांना अनावश्यक त्रास देणाऱ्यांच्या धोरणांना बळी पडू नये,"
पोप यांच्या पत्रावर ट्रम्प सरकारने उत्तर दिले आहे. तसेच या पत्रावर तीव्र प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी कॅथलिक चर्चशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष द्यावे, अशी टीका अमेरिकेचे सीमा सुरक्षा अधिकारी जायर होमन यांनी केली आहे. पोप यांनी कॅथॉलिक चर्चशी चिकटून लवकरात लवकर तेथील प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा असे देखील होमर यांनी म्हटलं आहे. त्यांनी आमच्या देशातील प्रश्नावर लुडबूड करण्यापेक्षा चर्च संबंधी अंतर्गत मुद्द्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण त्या ठिकाणी मोठा घोटाळा सुरू आहे, असे होमन यांनी पत्रकारांना सांगितले.
यापूर्वी देखील पोप फ्रान्सिस यांनी सातत्याने अमेरिकेच्या स्थलांतरविरोधी धोरणांवर टीका केली आहे. मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या प्रस्तावाबाबत ट्रम्प यांच्या 'नॉट अ ख्रिश्चन' या शब्दांचाही त्यांनी उल्लेख केला होता. दरम्यान, ट्रम्प पुन्हा राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी निर्वासितांच्या धोरणावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी शपथ घेताच ५०० हून अधिक स्थलांतरितांना देशाबाहेर काढले. ट्रम्प प्रशासनाच्या प्रक्रियेबाबत पोप फ्रान्सिस यांना विचारले असता ते म्हणाले की, जर हे खरे असेल तर ते अत्यंत अपमानास्पद आहे. ज्या गरिबांना उदरनिर्वाह करणे कठीण आहे त्यांना त्रास देणारे हे विधान आहे. या धोरणामुळे हा प्रश्न सुटणारा नाही असे देखील पोप यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या