jagannath puri : पुरीमध्ये भगवान जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; एका भाविकाचा मृत्यू, रथ ओढताना अनेक भाविक जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  jagannath puri : पुरीमध्ये भगवान जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; एका भाविकाचा मृत्यू, रथ ओढताना अनेक भाविक जखमी

jagannath puri : पुरीमध्ये भगवान जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; एका भाविकाचा मृत्यू, रथ ओढताना अनेक भाविक जखमी

Published Jul 08, 2024 07:04 AM IST

jagannath puri stamped : ओडिशातील पुरी येथे भव्य आणि ऐतिहासिक भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत अनेक भाविक जखमी झाले. तर एका भविकाचा मृत्यू झाला आहे.

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; एका भाविकाचा मृत्यू, रथ ओढताना अनेक भाविक जखमी
पुरीमध्ये भगवान जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; एका भाविकाचा मृत्यू, रथ ओढताना अनेक भाविक जखमी

jagannath puri stamped : ओडिशातील पुरी येथे भव्य आणि ऐतिहासिक भगवान जगन्नाथ रथयात्रेला रविवार पासून सुरुवात झाली आहे. दरम्यान या रथ यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक जमले असून या यात्रेत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत एका भविकाचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो भाविक जखमी झाले. रथ ओढत असताना हाणामारीत ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आपत्कालीन सेवांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भगवान जगन्नाथाच्या ऐतिहासिक रथयात्रेत लाखो भाविकांनी गर्दी केली होती. यंदा ही यात्रा दोन दिवस चालणार आहे.

भगवान जगन्नाथाचा अंदाजे ४५ फूट उंच लाकडी रथ ओढण्यासाठी रविवारी, ७ जुलै रोजी पुरीत लाखो लोक जमले होते. हे वार्षिक आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे, ज्यामध्ये भगवान जगन्नाथ आणि देवी सुभद्रा यांचे रथ भक्तांनी ओढले आहेत. या पवित्र प्रसंगी हजारो भाविक देवाचे दर्शन घेण्यासाठी जय जगन्नाथ आणि हरिबोलचा जयघोष करत या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी सुमारे १० लाख भाविक पुरी येथील रथ यात्रेत आले झाल्याचा अंदाज आहे. चेंगराचेंगरीत शेकडो भाविक जखमी झाले आहेत. तर काही भाविकांना लहान-मोठी इजा झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. गंभीर जखमी असलेल्या भाविकांवर उपचार केले जात आहेत. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेला भाविक हा परराज्यातील असून त्या व्यक्तीबाबतची माहिती मिळालेली नाही.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात रथ ओढण्यासाठी भाविक जमले होते. श्री बलभद्र यांचा रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. यामुळे भविकांत धक्काबुक्की सुरू झाली. या गोंधळाचं रूपांतर चेंगराचेंगरीत झालं. या गोंधळात एक भाविक खाली पडला. व इतर भाविकांनी ट्याच्या अंगावर पाय दिल्याने त्याचा चेंगरांचेंगरीत मृत्यू झाला.

रथयात्रेत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती कुठे निर्माण झाली?

'जय जगन्नाथ', 'हरबोल'चा नारा आणि झांजांच्या आवाजाने बाराव्या शतकातील मंदिर आणि तीन किलोमीटर लांबीचा भव्य रस्ता दुमदुमून गेला. मंदिरातील सेवक देतापतींनी आपापल्या रथांना मंदिराच्या गर्भगृहात जोडले आणि देवतांना 'रत्न सिंहासन'मधून बाहेर काढल्यामुळे याला 'बडा दंड' म्हणून ओळखले जाते. मोठा दांडा येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

५३ वर्षांनंतर असा योगायोग, सर्व विधी एकाच दिवशी

यावेळी तब्बल ५३ वर्षांच्या कालावधीनंतर ७ जुलै रोजी एकाच दिवशी नेत्र उस्ताव, देवतांचे नबजौबन दर्शन आणि रथयात्रा असे विधी पार पडले. रविवारी तिन्ही प्रमुख विधी एकाच दिवशी होत असल्याने रस्त्यावर काही मीटर गर्दी उसळल्यानंतर रथ ओढण्याची प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता आहे. जगन्नाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरासाठी ही यात्रा सोमवारी सकाळी पुन्हा सुरू होईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर