SSC GD Results 2024: एसएससी जीडी निकाल २०२४ च्या घोषणेबद्दल उत्सुकता वाढत असतानाच, रिक्त पदांची संख्या आता जवळजवळ दुप्पट झाली आहे. एसएससीने जारी केलेल्या ताज्या अधिसूचनेनुसार, रिक्त पदांची संख्या २६,१४६ वरून ४६, ६१७ करण्यात आली आहे.
बीएसएफ: १२०७६ जागा
सीआयएसएफ: १३६३२ जागा
सीआरपीएफ: ९४१० जागा
एसएसबी: १९२६ जागा
आयटीबीपी: ६२८७जागा
एआर: २९९० जागा
एसएसएफ : २९६ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशनने (एसएससी) यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ), एसएसएफ आणि रायफलमन (जीडी) मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) साठी भरती परीक्षा आयोजित केली होती. परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली असून येत्या काही दिवसात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार एसएससी जीडी निकाल ssc.gov.in या संकेत स्थळावर पाहू शकतात.
कॉन्स्टेबल जीडी परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली. सर्वप्रथम आयोगाने २० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान ही परीक्षा घेतली. मात्र, काही उमेदवारांनी परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आणून दिल्याने ३० मार्च रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली.
(Staff Selection Commission) एसएससी कॉन्स्टेबल जीडी 2024 फेरपरीक्षेसाठी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरून ते डाउनलोड करू शकता.स्टाफ सिलेक्शन कमिशनने एसएससी कॉन्स्टेबल जीडी अॅडमिट कार्ड 2024 जारी केले आहे. आसाम रायफल्स परीक्षा, २०२४ मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफएस), एसएसएफ आणि रायफलमन (जीडी) मध्ये कॉन्स्टेबल (जीडी) साठी संगणक आधारित परीक्षा देणारे उमेदवार प्रादेशिक एसएससीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
अधिकृत सूचनेनुसार, आयोग ३० मार्च २०२४ रोजी परिशिष्टात नमूद केलेल्या तारखा / ठिकाणे / शिफ्टमध्ये परीक्षेस बसलेल्या उमेदवारांची फेरपरीक्षा घेईल. कम्प्युटराईज्ड परीक्षेत यापूर्वी बसलेल्या उमेदवारांनाच फेरपरीक्षेला बसण्याची परवानगी असेल.
संबंधित बातम्या