SSC GD 2025 exam Date : कर्मचारी निवड आयोग फेब्रुवारीमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि एसएसएफमध्ये कॉन्स्टेबल (जीडी), आसाम रायफल्समध्ये रायफलमन (जीडी) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो परीक्षा, 2025 मध्ये शिपाई परीक्षा आयोजित केली जाणार आहे. आयोग या परीक्षेचे प्रवेशपत्र प्रादेशिक संकेतस्थळांवर उपलब्ध करून देणार आहे.
पदवीधर उमेदवार ज्या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत असतात, ज्यासाठी तयारी करत असतात ती स्टाफ सिलेक्शनची परीक्षा जाहीर झाली आहे. स्टाफ सिलेक्शनकडून सीजीएल परीक्षेची घोषणा करण्यात आली असून लवकरच प्रवेशपत्र कमिशनच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जातील. या भरतीद्वारे देशभरातील विविध सरकारी आस्थापनांमध्ये पदभरती केली जाणार आहे. या भरतीद्वारे अंदाजे १७ हजार ७२७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वेळापत्रकानुसार एसएससी जीडी परीक्षा ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १७, १८, १९, २०, २१, २२ आणि २५ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल.
प्रवेशपत्रापूर्वी आयोग सिटी इन्फॉर्मेशन स्लिप जारी करेल, ज्यामध्ये उमेदवारांना त्यांचे परीक्षा केंद्र कोठे असेल,याची माहिती दिली जाईल. त्यानंतर अॅडमिट कार्ड जारी केले जाईल, जिथे उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता, परीक्षेची तारीख, पेपरची वेळ, रिपोर्टिंग वेळ, परीक्षेच्या दिवसाच्या मार्गदर्शक सूचना इत्यादी माहिती मिळेल.
बीएसएफ (BSF) : १५६५४ जागा
सीआयएसएफ (CISF): ७१४५ जागा
सीआरपीएफ (CRPF) : ११५४१ जागा
एसएसबी ( SSB): ८१९ जागा
आयटीबीपी (ITBP) : ३०१७ रिक्त जागा
एआर (AR) : १२४८ जागा
एसएसएफ (SSF): ३५ जागा
एनसीबी (NCB): २२ जागा.
उमेदवारांना या भरती परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी १ जानेवारी २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी इयत्ता १० वी अंतिम परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या तारखेला त्यांचे वय १८ आणि २३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती प्रक्रियेत संगणक-आधारित परीक्षा (सीबीई), त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी), शारीरिक मानक चाचणी (पीएसटी) आणि वैद्यकीय परीक्षा / कागदपत्र पडताळणीचा समावेश असेल.
संगणकावर आधारित ही परीक्षा १६० गुणांची असेल आणि परीक्षेचा कालावधी ६० मिनिटांचा असेल. ८० प्रश्न असतील, प्रत्येकी २ गुण असतील.
इंग्रजी, हिंदी आणि आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा १३ प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या