SSC Constable GD Admit Card : एसएससी कॉन्स्टेबल जीडी फेर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाऊनलोड
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SSC Constable GD Admit Card : एसएससी कॉन्स्टेबल जीडी फेर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाऊनलोड

SSC Constable GD Admit Card : एसएससी कॉन्स्टेबल जीडी फेर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाऊनलोड

Updated Jun 12, 2024 07:58 PM IST

SSC Constable GD Admit Card 2024 : एसएससी कॉन्स्टेबल जीडी 2024 फेरपरीक्षेसाठी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. डाउनलोड लिंक येथे दिल्या आहेत.

एसएससी कॉन्स्टेबल जीडी फेर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर
एसएससी कॉन्स्टेबल जीडी फेर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

SSC Constable GD Admit Card 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशनने एसएससी कॉन्स्टेबल जीडी ॲडमिट कार्ड २०२४ जारी केले आहे. आसाम रायफल्स परीक्षा, २०२४ मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफएस), एसएसएफ आणि रायफलमन (जीडी) मध्ये कॉन्स्टेबल (जीडी) साठी संगणक आधारित परीक्षा देणारे उमेदवार प्रादेशिक एसएससीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

अधिकृत सूचनेनुसार, आयोग ३० मार्च २०२४ रोजी परिशिष्टात नमूद केलेल्या तारखा / ठिकाणे / शिफ्टमध्ये परीक्षेस बसलेल्या उमेदवारांची फेरपरीक्षा घेईल. संगणकावर आधारित परीक्षेत यापूर्वी बसलेल्या उमेदवारांनाच फेरपरीक्षेला बसण्याची परवानगी असेल.

खालील लिंकवरून  प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतो -

या लिंकवरून प्रवेशपत्र कशी डाऊनलोड करायची? (SSC Constable GD Admit Card 2024: How to download)

प्रादेशिक वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या टप्प्यांचे अनुसरण करू शकतात.

 

  • एसएससीच्या प्रादेशिक संकेतस्थळांना भेट द्या.
  • होम पेजवर उपलब्ध एसएससी कॉन्स्टेबल जीडी ॲडमिट कार्ड 2024 लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • तुमचे ॲडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • ॲडमिट कार्ड तपासा आणि पेज डाऊनलोड करा.
  • पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

संगणक-आधारित परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार शारीरिक मानक चाचणी (पीएसटी), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी), वैद्यकीय परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी फेरीसाठी उपस्थित राहू शकतात. एसएससी जीडी २०२४ च्या माध्यमातून विविध युजर ऑर्गनायझेशनमध्ये एकूण २६,१४६ रिक्त जागा भरल्या जातील. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार एसएससीची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

दहावी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात नोकरी -

एसटी महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची एकूण २५६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. मोटार वाहन मेकॅनिक, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी २४ मे २०२४ रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. दहावी पास उमेदवाराकडे आयटीआय किंवा डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये झालेला असावा.

रिक्त पदे

मोटर मेकॅनिक- ६५ जागा

डिझेल मॅकेनिक- ६४ जागा

शीट मेटल वर्कर- २८ जागा

वेल्डर- १५ जागा

इलेक्ट्रिशियन- ८० जागा

टर्नर- २ जागा

मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअर/डिप्लोमा- २ जागा

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर