SSC CGL Notification 2024: स्टाफ सिलेक्शनची ग्रुप B आणि C साठी १७,७२७ पदांची जाहिरात आली, वाचा सविस्तर माहिती
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SSC CGL Notification 2024: स्टाफ सिलेक्शनची ग्रुप B आणि C साठी १७,७२७ पदांची जाहिरात आली, वाचा सविस्तर माहिती

SSC CGL Notification 2024: स्टाफ सिलेक्शनची ग्रुप B आणि C साठी १७,७२७ पदांची जाहिरात आली, वाचा सविस्तर माहिती

Updated Jun 24, 2024 07:53 PM IST

SSC CGL Recruitment 2024: कर्मचारी निवड आयोगाने संयुक्त पदवी स्तर (सीजीएल) परीक्षा २०२४ साठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. वाचा संपूर्ण तपशील..

स्टाफ सिलेक्शनची ग्रुप B आणि C साठी १७,७२७ पदांसाठी जाहिरात आली
स्टाफ सिलेक्शनची ग्रुप B आणि C साठी १७,७२७ पदांसाठी जाहिरात आली

SSC Combined Graduate Level CGL Notification 2024: कर्मचारी निवड समिती द्वारे आज, २४ जून रोजी एसएससी सीजीएलचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार संयुक्त ग्रॅज्युएशन लेव्हल परीक्षा, २०२४ साठी एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर नोटिफिकेशन पाहू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २४ जुलै २०२४ आहे. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षा शुल्क म्हणून जनरल, ओबीसी और ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये भरावे लागतील.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) ने आज, २४ जून रोजी संयुक्त पदवी स्तर (सीजीएल) परीक्षेसाठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर आपले अर्ज सादर करू शकतात. अधिकृत अधिसूचनेनुसार, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.

 

एसएससी सीजीएल 2024 साठी अर्ज करण्याची थेट लिंक

 

अर्ज करण्यासाठी  महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे :

  • ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ: २५ जुलै २०२४, रात्री ११ वाजेपर्यंत.
  • दुरुस्ती विंडो आणि ऑनलाइन शुल्क भरणे : १० ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४ रात्री ११ वाजेपर्यंत.
  • टियर-१ (संगणक आधारित परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक): सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४.
  • टियर-२ (संगणक आधारित परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक): डिसेंबर २०२४

वयोमर्यादा :

  • ज्या पदांसाठी वयोमर्यादा १८-२७ वर्षे आहे: जन्म २ ऑगस्ट १९९७ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००६ नंतर नसावा.
  • ज्या पदांसाठी वयोमर्यादा २० ते ३० वर्षे आहे : जन्म २ ऑगस्ट १९९४ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००४ नंतर नसावा.
  • ज्या पदांसाठी वयोमर्यादा १८-३० वर्षे आहे : जन्म २ ऑगस्ट १९९४ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००६ नंतर नसावा.
  • ज्या पदांसाठी वयोमर्यादा १८-३२ वर्षे आहे : जन्म २ ऑगस्ट १९९२ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००६ नंतर नसावा.

SSC Constable GD Admit Card : एसएससी कॉन्स्टेबल जीडी फेर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाऊनलोड

वयोमर्यादेत सूट:

  • एससी/एसटी : ५ वर्षे
  • ओबीसी: ३ वर्षे
  • पीडब्ल्यूबीडी (अनारक्षित): १० वर्षे
  • पीडब्ल्यूबीडी (ओबीसी): १३ वर्षे
  • पीडब्ल्यूबीडी (एससी/एसटी): १५ वर्षे

विशेष म्हणजे, परीक्षेच्या माध्यमातून आयोगाने १७७२७ रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रिक्त पदांची अंतिम संख्या योग्य वेळी निश्चित केली जाईल, असे आयोगाने अधिसूचनेत म्हटले आहे.

उमेदवार या लिंकवर क्लिक करून अधिकृत नोटीस पाहू शकतात.

SSC CGL भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रुप B  आणि  ग्रुप C पदे भरली जातील. यामध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इंस्पेक्टर, सब- इंस्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, सीनियर सेक्रेट्रिएट असिस्टंट/ अपर डिविजन क्लर्क, ऑडिटर, टॅक्स असिस्टेंट, अकाउंटंट/ जूनियर अकाउंटंट,जूनियर स्टेट्सटिकल ऑफिसर आणि स्टेट्सटिकल इनवेस्टिगेटर ग्रेड- II आदि पदांचा समावेश आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर