Viral News: मुंबई- बंगळुरू प्लाइटच्या शौचालयात दीड तास अडकला प्रवासी, मग पुढं काय झालं? वाचा-spicejet viral news man stuck in aircraft loo for mumbai bengaluru flight ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: मुंबई- बंगळुरू प्लाइटच्या शौचालयात दीड तास अडकला प्रवासी, मग पुढं काय झालं? वाचा

Viral News: मुंबई- बंगळुरू प्लाइटच्या शौचालयात दीड तास अडकला प्रवासी, मग पुढं काय झालं? वाचा

Jan 17, 2024 11:07 AM IST

Man stuck in SpiceJet Plane Toilet:मुंबई- बंगळुरू विमानातून प्रवास करताना एक प्रवासी शौचालयात अडकून पडल्याची घटना घडली.

SpiceJet
SpiceJet

Man stuck in Mumbai Bengaluru flight: स्पाइसजेटच्या विमानातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई- बंगळुरू विमानातून प्रवास करणारा एक प्रवासी शौचालयात अडकून पडल्याची घटना घडली. दरवाजा लॉक झाल्याने प्रवासी जवळपास १०० मिनिटे शौचालयात अडकून होता. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अभियंत्यांनी शौचालयाचा दरवाजा तोडल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. ही घटना फ्लाइट एसजी- २६८ मध्ये घडली. या विमानाने मंगळवारी पहाटे २ वाजता मुंबई विमानतळावरून बंगळुरूच्या दिशेने उड्डाण केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान सोमवारी रात्री १०.५५ वाजताच्या सुमारास उड्डाण करणार होते. मात्र, काही कारणास्तव उशीर झाल्याने हे विमान मंगळवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास बंगळुरूच्या दिशेने रवाना झाले. या विमानात प्रवाशासोबत घडलेल्या घटनेसंबंधित एअरलाइन कंपनी स्पाईसजेटनेही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. KIA ग्राउंड स्टाफच्या एका सदस्याने सांगितले की, " स्पाइसजेटच्या मुंबई- बंगळुरू विमानातील १४ डी वर बसलेला प्रवासी विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेच शौचालयात गेला. मात्र, शौचालयाचा दरवाजा खराब झाल्यामुळे तो आत अडकला."

शौचालयात अडकल्याचे समजताच संबंधित प्रवाशाने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर विमानातील क्रू मेंबर्स धावून आले. त्यांनी शौचालयाचा दरवाजा बाहेरून उघडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, प्रवाशाला त्याचा संपूर्ण प्रवास शौचालयात बसूनच करावा लागला. अनेक प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नसल्याचे क्रू मेंबरच्या लक्षात आले. दरम्यान, "सर, आम्ही दरवाजा उघडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु, दरवाजा उघडत नाही. घाबरू नका. आम्ही काही मिनिटांत लँडिंग करत आहोत. त्यामुळे कमोडचे झाकण बंद करून त्यावर बसून स्वतःचे संरक्षण करा. मेन गेट उघडताच इंजिनियर येईल." असे एका मोठ्या कागदावर लिहून प्रवाशाला शौचालयाच्या दरवाजाच्या खालून देण्यात आले.

दरम्यान, मंगळवारी पहाटे ३.४३ वाजता विमान लँड झाले. त्यानंतर इंजिनियर विमानात चढले. त्यांनी दरवाजा तोडला आणि दोन तासांच्या मेहनतीनंतर त्या व्यक्तीला शौचालयातून बाहेर काढले. प्रवाशाला तातडीने प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. क्लस्ट्रोफोबियामुळे प्रवासी अस्वस्थ झाला होता,अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Whats_app_banner
विभाग