मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

May 19, 2024 10:26 PM IST

Karnataka News : प्रगती मानसिक आजारी होती. तीन दिवस ती आपल्या मृत आईजवळ झोपून घालवले होते.

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी
आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी

कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यात कुंडापूर तालुक्यात गोपाडी गावात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एक महिला आपल्या आईसोबत तीन दिवस घरात बंद होती. काही दिवसांनतर घरातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. जेव्हा पोलिसांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला तेव्हा आतील दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. समजले की, तीन दिवस आधीच मां जयंती शेट्टी यांचे निधन झाले होते व घरात त्यांचा मृतदेह पडला होता. त्यांच्या बाजुलाच मुलगी प्रगती शेट्टी बेशुद्ध होऊन पडली होती. प्रगतीची प्रकृती नाजूक होती. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तिचा मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

मुलगी मानिसक दृष्ट्या आजारी - 
सांगितले जात आहे की, प्रगती मानसिक आजारी होती. तीन दिवस ती आपल्या मृत आईजवळ झोपून घालवले होते. जयंती शेट्टी यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त होती. त्याचबरोबर त्यांची मुलगी प्रगतीही मधुमेहाने ग्रस्त होती. प्रगतीची प्रकृती इतकी खराब होती की, महिन्यापूर्वी तिचा एक पाय कापावा लागला होता. योग्य देखभाल आणि सहायतेच्या अभावी तिचे मानसिक आरोग्य खराब झाले होते.

आईच्या मृतदेहाशेजारी घालवले तीन दिवस - 
शेजाऱ्यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा प्रगती बेशुद्ध अवस्थेत आढळली. प्रगती शेट्टीला पाणी दिले गेले व तत्काळ रुग्णालयात दाखल केले गेले.  तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तिचा मृत्यू झाला. कुंडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिकारी जयंती शेट्टी यांचा मृत्यू आणि प्रगतीच्या आजाराशी संबंधित परिस्थितीचा तपास करत आहेत.

प्रियकराने तरुणीची चाकूने वार करत केली हत्या -

कर्नाटकमधली हुबळीत झालेले नेहा हिरेमथ हत्याकांड ताजे असतानाच आणखी एका तरुणीची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. हुबळीच्या कॉलेजमध्ये २१ वर्षीय नेहाची तिच्याच मित्राने चाकूने वार करून हत्या केली होती. आरोपीने तरुणीला अशाच प्रकारे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तरुणीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र काहीच फायदा झाला नाही. या हत्येनंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आरोपीसह संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर बेजबाबदारपणा दाखवल्यामुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग