पनीर आणि मशरूमनंतर शाकाहारी लोकांसाठी सोया चाप हा एक उत्तम प्रोटीन स्त्रोत मानला जातो, आजकाल तो सर्वांचा आवडता स्नॅक बनला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सपासून महागड्या रेस्टॉरंट्सपर्यंत सगळीकडे सोया चापचा आस्वाद घेतला जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का हा सोया चाप कसा तयार केला जातो? नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात सोया चाप कारखान्याची अवस्था पाहून लोक हैराण आणि अस्वस्थ झाले आहेत.
foodiee_sahab नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अत्यंत घाणेरड्या आणि अस्वच्छ कारखान्यात सोया चाप बनवला जात असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारखान्याभोवती घाण आणि धुळीचे वातावरण असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. सोया चाप बनवणाऱ्या कामगारांनी ना हातमोजे घातले आहेत, ना स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. एक मजूर मळलेल्या पायांनी सोयाबीनचे पीठ मळताना दिसला.
या व्हिडिओला आतापर्यंत ५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या कारखान्यात तयार होणाऱ्या सोया चापवर बंदी घालण्याची मागणी अनेकांनी केली आहे. त्याचबरोबर देशातील छोट्या कारखान्यांच्या दुरवस्थेवरही काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सोया चाप हा उत्तर भारतातील लोकप्रिय स्ट्रीट फूड असून हे बनवण्यासाठी सोया आणि परिष्कृत गव्हाचे पीठ किंवा मैदा वापरला जातो. सोया चाप हे पौष्टिक असून, त्याला मसाला लावून खाल्ले जाते. सोया चाप चविष्ट तसेच आरोग्यदायी आहे. प्रोटीन रिच असल्याने बहुतेक शाकाहारी लोकांना ते खाणे आवडते. पण बाजारात मिळणारे सोया चाप अनेक वेळा अत्यंत अस्वच्छ पद्धतीने सोया चाप बनवण्यात येतात. तसेच अनेक वेळा बाहेर मिळणाऱ्या सोया चापमध्ये प्रथिने कमी म्हणजेच सोया कमी आणि मैदा जास्त असते. त्यातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोया चाप प्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
संबंधित बातम्या