मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Railway Platform Ticket: सणासुदीत प्लॅटफॉर्मवर होतेय गर्दी, रेल्वेनं वाढवले प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर

Railway Platform Ticket: सणासुदीत प्लॅटफॉर्मवर होतेय गर्दी, रेल्वेनं वाढवले प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 30, 2022 11:09 AM IST

Railway Platform Ticket: रेल्वे स्टेशनवर प्रवशांना सोडण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे गर्दी होत असल्यानं दक्षिण रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सणासुदीत प्लॅटफॉर्मवर होतेय गर्दी, रेल्वेनं वाढवले प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर
सणासुदीत प्लॅटफॉर्मवर होतेय गर्दी, रेल्वेनं वाढवले प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर

Railway Platform Ticket: रेल्वेने आता प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीत आता वाढ केली आहे. ऐन सणासुदीत रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवले आहेत. रेल्वेने १० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट २० रुपये केलं आहे. रेल्वे स्टेशनवर प्रवशांना सोडण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे गर्दी होत असल्यानं दक्षिण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

दक्षिण रेल्वेकडून प्लॅटफॉर्मच्या तिकिटात वाढ केली गेली आहे. दक्षिण रेल्वेने ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म तिकिटातील नवे बदल हे एक ऑक्टोबरपासून ३१ जानेवारी २०२३ पर्यंत लागू राहतील. रेल्वेकडून सांगण्यात आले की, सणांमध्ये गर्दी कमी करण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे.

दक्षिण रेल्वेने दर चेन्नई विभागात वाढवले आहेत. नोटिफिकेशननुसार एकूण ८ रेल्वे स्टेशन्सचा समावेश आहे. रेल्वेने सांगितलं यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल. प्रवाशांव्यतिरिक्त प्लॅटफॉर्मवर येणारी गर्दी कमी होईल. कोरोनाकाळात प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरात सर्वाधिक वाढ झाली होती. ही वाढ अनेक महिने होती. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या काचीगुडा इथं प्लॅटफॉर्म तिकिटात १० रुपयांवरून २० रुपये करण्यात आले होते.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग