South Korea Viral News: दक्षिण कोरिया येथील बांधकाम कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. मुल जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी तब्बल ७५ हजार डॉलर (अंदाजे ६२.२८ लाख) देणार आहे, असे वृत सीएनएनने दिली. दक्षिण कोरियात जन्मदर कमी झाल्याने तरुणांची संख्या कमी तर वृद्धांची संख्या जास्त झाली आहे. यामुळे देशातील जन्मदर वाढवण्यासाठी नवनवीन योजना आखल्या जातात.
दक्षिण आफ्रिकेतील बांधकाम कंपनी बूयंग ग्रुपने त्यांच्या कर्मचाऱ्यांना २०२१ पासून ७० मुलांना जन्म देणाऱ्या कर्मचार्यांना एकूण ७ अब्ज कोरियन वोन (५.२५ दशलक्ष डॉलर्स) रोख देयके देण्याची घोषणा केली. बूयंग ग्रुपचे चेअरमन ली जुंग-क्यून यांनी सीएनएनला सांगितले की, मुलांच्या संगोपनाचे ओझे हलके करण्यासाठी ते कर्मचाऱ्यांना 'आर्थिक मदत" देत आहेत. मला आशा आहे की, जन्म आणि देशाच्या भवितव्याबद्दल चिंता करण्यास प्रोत्साहित करणारी कंपनी म्हणून आमची ओळख होईल, असेही ते म्हणाले.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ली जुंग-क्यून यांनी कंपनीच्या एका कार्यक्रमात सांगितले की, सरकारने इमारतीसाठी जमीन पुरवली तर तीन मुलांना जन्म देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३०० दशलक्ष कोरियन वॉन (२ लाख २५ हजार डॉलर) रोख किंवा भाड्याचे घर घेण्याचा पर्याय दिला जाईल.
सांख्यिकी कोरिया या दक्षिण कोरियातील राष्ट्रीय सांख्यिकी व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या सरकारी संस्थेच्या म्हणण्यानुसार, प्रजनन दर किंवा प्रति दक्षिण कोरियन महिलेच्या पुनरुत्पादक आयुष्यात अपेक्षित बाळांची सरासरी संख्या २०२२ मध्ये ०.८१ वरून ०.७८ पर्यंत घसरली आहे. तज्ज्ञांच्या मते, देशाची ५२ दशलक्ष लोकसंख्या टिकवण्यासाठी हा दर किमान २.१ असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नवजात बालकांची संख्या २ लाख ६० हजार ६०० वरून २ लाख ४९ हजारवर आली आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनने गेल्या वर्षी तीन मुलांना जन्म देणाऱ्या कुटुंबांना भरघोस बक्षीर जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती. चीनमधील बहुतांश लोकसंख्या वृद्ध आहे आणि हे टाळण्यासाठी त्यांच्या सरकारने नव्या धोरणाचा अवलंब केला होता.
संबंधित बातम्या