दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक-येओल यांनी मंगळवारी विरोधी पक्षांवर सरकारविरोधी कारवाया करणे, उत्तर कोरियाप्रति सहानुभूती ठेवणे आणि देशाची संवैधानिक व्यवस्था कमकुवत करण्याचा आरोप करत देशात 'इमर्जन्सी मार्शल लॉ'ची घोषणा केली आहे. त्यांनी टेलिव्हिजनवरून देशाला संबोधित करताना ही घोषणा केली. या घोषणेने दक्षिण कोरियात तनावाची स्थिती असून विरोधी पक्षांच्या खासदारांचे अटकसत्र सुरू आहे.
दक्षिण कोरियात यून सूक येओल यांच्या सरकारने मंगळवारी मोठं पाऊल उचलत देशभरात आपत्कालीन मार्शल लॉ लागू केला. अर्थसंकल्पीय विधेयकावरून संसदेत सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात मतभेद सुरू असतानाच देशात मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. राजधानी सेऊलमध्ये या निर्णयावरून खळबळ उडाली असून गल्लीपासून संसदेपर्यंत निदर्शने होत आहेत. संसदेने या निर्णयाच्या विरोधात मतदान केले. संसदेवर हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. लष्कराने विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांना अटक केली असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले आहे की, विरोधी पक्षाचे खासदार उत्तर कोरियाच्या इशाऱ्यावर देशविरोधी कारवाया करत आहेत. यामुळे देशात अराजकाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षाचे खासदार जाणीवपूर्वक देशाच्या विकास प्रकल्पांच्या बजेटमध्ये कपात करून देशाला मागे ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी पीपल्स पॉवर पार्टी आणि विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात अर्थसंकल्पीय विधेयकावरून मतभेद सुरू असताना त्यांनी हा आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे.
दक्षिण कोरियात मार्शल लॉ लागू झाल्यानंतर देशभरात गदारोळ माजला आहे. संसदेने मार्शल लॉची घोषणा थांबवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. त्याचवेळी रस्त्यावर पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. संसद भवनात हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. देशांतर्गत राजकीय मुद्द्यांमुळे मार्शल लॉ घोषित करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीमध्ये १९० खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान करून ते बेकायदेशीर ठरवले. विरोधी पक्षनेते ली जे-म्यूंग म्हणाले की, राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉ लादणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि आम्ही कोणत्याही किंमतीवर ते स्वीकारणार नाही.
दुसरीकडे, अमेरिकेने दक्षिण कोरियात मार्शल लॉ लागू करणे ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री कर्ट कॅम्पबेल म्हणाले की, दक्षिण कोरियाशी अमेरिकेची मैत्री अतूट आहे. मात्र, व्हाईट हाऊस दक्षिण कोरियातील घडामोडींवर गंभीर चिंतेने लक्ष ठेवून आहे. दक्षिण कोरियातील कोणताही राजकीय वाद शांततेने आणि कायद्यानुसार सोडवला जाईल, अशी आम्हाला आशा आहे. "
संबंधित बातम्या