Viral News: बायकोचीची इच्छा पूर्ण करणे, हे प्रत्येक पतीला जमतेच असे नाही. यामुळे अनेक जोडप्यात वाद होत असतात. मात्र, सोशल मीडियावर अशी एक बातमी व्हायरल होत आहे, जी वाचल्यानंतर प्रत्येक मुलगी म्हणेल मलाही असाच नवरा मिळावा. बायकोला बिकनीत फिरता यावे म्हणून तिच्या नवऱ्याने कोट्यावधी रुपये खर्च करून बेट खरेदी केल्याची माहिती समोर आली. संबंधित महिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आपल्या नवऱ्याने विकत घेतलेल्या बेटवर पोहोचली आहे.
सौदी अल नादक असे या २६ वर्षीय संबंधित महिलेचे नाव आहे. तिचा पती एक अरबोपती आहे. पत्नीला बिकिनी घालण्याची इच्छा झाली. अशा वेळी तिची सुरक्षा आणि खाजगी क्षणाचा विचार करता तिच्या पतीने थेट बेटच विकत घेतले. तिने आपल्या इंस्टाग्रामवर या बीच वरील आपल्या पतीसोबतचे काही सुंदर फोटो शेयर केले आहेत. सौदी यांनी गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव बेटाचे नेमके ठिकाण सांगण्यास नकार दिला. परंतु, तिच्या नवऱ्याने यासाठी तब्बल ५० दशलक्ष डॉलर्स खर्च केले.
सौदी अल नदाकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.अवघ्या एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत २.४ दशलक्ष लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.याशिवाय, सौदीने त्याच्या लक्झरी लाइफशी संबंधित अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. सौदीच्या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की, 'तुम्ही इतके श्रीमंत आहात, मग स्वत:साठी चार्टर्ड विमानही खरेदी करावे'. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'बायकोला बिकतनीत फिरता यावं म्हणून बेट विकत घेतले आहे, जे छान खूप आहे'. आणखी एका युजरने असे म्हटले आहे की, 'माझा स्विमिंग पूल माझ्यासाठी पुरेसा आहे.' एका युजरने म्हटले आहे की, 'अशी महिला त्याच्यासोबत असेल तर, वाटत नाही तो जास्त काळ अब्जाधीश राहील.'
संबंधित बातम्या