Google news : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या गोष्टी! नाही तर सर्व काही होईल हॅक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google news : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या गोष्टी! नाही तर सर्व काही होईल हॅक

Google news : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या गोष्टी! नाही तर सर्व काही होईल हॅक

Nov 11, 2024 12:57 PM IST

Google news : एसओएफओएसने गूगलच्या यूझर्सना एक चेतावणी जारी केली आहे. जेव्हा यूझर्स सर्च रिझल्टवर क्लिक करतात तेव्हा त्यांची वैयक्तिक आणि बँक माहिती गूटलोडर नावाच्या प्रोग्रामच्या मदतीने ऑनलाइन हॅक केली जात आहे.

चुकूनही गुगलवर सर्च करू नका या गोष्टी! नाही तर सर्व काही होईल हॅक, चेतावनी जारी
चुकूनही गुगलवर सर्च करू नका या गोष्टी! नाही तर सर्व काही होईल हॅक, चेतावनी जारी

Google news : भारतात इंटरनेटचा सर्वाधिक वापर केला जात आहे. मोबाइल फोनवर सर्वाधिक नेट वापरलं जातं. मात्र, तंत्रज्ञाचा फायदा घेत अनेक सायबर गुन्हेगार आता नागरिकांच्या फसवणुकीचे विविध मार्ग अवलंबवत आहेत.  या साठी हॅकर्स इंटरनेटवर विशिष्ट शब्द शोधतअसून त्यांच्या मदतीने फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे.  अशा प्रकारचे काही शब्द नेटवर सर्च करून संबंधित लिंकवर क्लिक करताच संबंधित व्यक्तिची  वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर केली जात असून एका प्रोग्रॅमच्या मदतीने कॉम्प्युटरचं कंट्रोलही युजरकडून काढून घेतलं जातं, अस तपासात पुढं आलं आहे.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायबर सिक्युरिटी कंपनी सोफोसकडून या बाबत  सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, काही नागरिक गुगलवरAre Bengal Cats legal in Australia? या बाबत सर्च करत आहेत. अशा नागरिकांची वैयक्तिक माहिती ही ऑनलाइन पोस्ट होत आहे. सर्च केल्यानंतर मिळालेल्या पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हा प्रकार उघड होत आहे.  

कंपनीचे म्हणणे आहे की,  युजर्स वरील सहा शब्द गूगलच्या सर्च इंजिनवर सर्च केल्यावर ते या प्रकारच्या   सायबर हल्ल्याला बळी पडत आहेत.  एसओएफओएसने म्हटले आहे की, "वापरकर्त्यांना वैध विपणन म्हणून सादर केल्या जाणार्या लिंक्स किंवा मेलीशियस एडवेयरवर क्लिक करण्याचं  आमिष दाखवलं जातं. हे सर्व वैध गुगल सर्चद्वारे केलं जात आहे. जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार, असं दिसतं की हॅकर्स सर्चमध्ये विशेषत: ऑस्ट्रेलिया हा शब्द सर्च करणाऱ्यांना प्रामुख्याने सायबर गुन्हेगार लक्ष्य करत आहेत.  

एसओएफओएसने सांगितले की, जेव्हा वापरकर्ते सर्च रिझल्टवर क्लिक करतात तेव्हा त्यांची वैयक्तिक आणि बँक माहिती गूटलोडर नावाच्या प्रोग्रामच्या मदतीने ऑनलाइन शेअर केली जात आहे. आणि या द्वारे त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. 

SEO poisoning च्या माध्यमातून  होत आहे फसवणूक 

सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी SEO poisoning पद्धत वापरत असल्याची माहिती आहे. असे म्हटले जाते की याचा अर्थ असे तंत्र आहे ज्याच्या मदतीने गुन्हेगार सर्च इंजिनच्या माहितीशी  छेडछाड करतात आणि ते चालवत असलेल्या वेबसाइटपर्यंत पोहोचतात. सोफोसने म्हटले आहे की, अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडणाऱ्यांनी त्यातडीने त्यांच्या खात्याचे  पासवर्ड बदलावे, जेणे करून होणारी फसवणूक टळेल. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर