Delhi Crime : दिल्लीतील समयपूर बादली येथे एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एक व्यक्ती आणि त्याच्या दोन पुतण्यांना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आईशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून केल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय चंदन झा असे हत्या झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. झा हे राजा विहार बादली येथे कुटुंबासोबत राहत असून गुरुवारी रात्री ते घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी चंदन झा यांचा मृतदेह एका उद्यानात सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर इन्स्पेक्टर मिंटू कुमार यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्यांच्या तपासात या हत्येचा उलगडा झाला आहे.
चंदनची पत्नी राणी गुजरातमध्ये राहत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याच दरम्यान चंदनची रीमा नावाच्या दुसऱ्या महिलेशी मैत्री झाली. खरं तर राणीचा पहिला नवरा सरोज कुमार ची पहिली पत्नी रीमा आहे. चौकशीनंतर असे समोर आले की, रीमाच्या दोन्ही मुलांना आईचे चंदनशी बोलणं आवडत नव्हतं. मुलांना आईंचे चंदनशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यामुले दोन्ही मुलांनी मामासोबत चंदनची हत्या करण्याचा कट रचला. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी चंदनला गुरुवारी रात्री दारू पिण्यासाठी उद्यानात बोलावले आणि तो नशेत असतांना त्याची हत्या केली.
दरम्यान, बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून एका गुंडाची विटांच्या दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना दिल्लीतील बुराडी भागात उघडकीस आली आहे. मृत प्रिन्स हा बुराडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत अट्टल गुन्हेगार होता. शनिवारी पोलिसांनी त्याचा मृतदेह शेतातून बाहेर काढला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय प्रिन्स कुटुंबासह बुराडी परिसरात राहत होता. त्याच्यावर चोरी आणि सोनसाखळी चोरीचे अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल होते. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रिन्सने गुरुवारी गोंधळ घातला होता, ज्यामुळे त्याला शांतता भंगच्या कलमाखाली अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला शुक्रवारी एसईएम कोर्टात नेले जिथे त्याची जामिनावर सुटका झाली.