Viral News : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा वाढदिवस आनंदाचा दिवस असतो व त्यादिवशी मिळालेली भेटवस्तू सर्वात सुंदर भेट असते. जर गिफ्ट महागडी असेल तर आनंद दुप्पट होतो. १८ वर्षाच्या तरुणाच्या आयुष्यात वाढदिवसाच्या दिवशी असा क्षण आला की, हा क्षण तो आयुष्यभर विसरणार नाही. एका उद्योगपती वडिलांनी आपल्या मुलाच्या १८ व्या वाढदिवसानिमित्त त्याला महागडी भेट दिली. त्यांनी आपल्या मुलाला ५ कोटी रुपये किंमतीची अलिशान कार (father gift Lamborghini Car to son) भेट म्हणून दिली. बर्थडे गिफ्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, वडिल आपल्या मुलाला त्याच्या स्वप्नातील कार गिफ्ट दिली आहे. याची किंमत कोटींच्या घरात आहे. या कारचे नाव लम्बोर्गिनी हुराकन एसटीओ(Lamborghinicar) आहे. विवेक कुमार रूंगटा आणि त्यांचा मुलगा तरुष यांचा हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हास्य उमटल्याशिवाय राहणार नाही.
तरुष याने त्याच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की,माझ्या स्वप्नातील कारभेट म्हणून देऊन माझा १८ वा वाढदिवस खास व जादुई बनवण्यासाठी माझे वडील विवेक कुमार रूंगटा यांचे आभार व खूप-खूप प्रेम! तुमचे प्रेम व समर्थन माझ्यासाठी सर्वकाही आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, रूंगटा आपल्या मुलासह लम्बोर्गिनीच्या शोरूममध्ये प्रवेश करतात जस-जसा व्हिडिओ पुढे जातो, पिवळ्या रंगाची लक्झरी कारचे अनावरण होते. व्हिडिओच्या शेवटी तरुष आपल्या वडिलांना आनंदाने मिठ्ठी मारतो. हा व्हिडिओ मागच्या महिन्यात पोस्ट केला होता. हा व्हिडिओ ११ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. याला हजारो लाईक्स मिळाले असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ लम्बोर्गिनी अबू धाबी आणि दुबईतील अधिकृत इंस्टाग्राम पेजवरही पोस्ट केला गेला आहे.
लोकांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया -
या पोस्टवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, खूपच चांगली गाडी, अभिनंदन, अन्य एकाने म्हटले की, अभिनंदन भावा, तुझा प्रवास चांगला होईल.
संबंधित बातम्या