Viral News : अंत्यसंस्कार न करता तब्बल तीन महीने आईच्या मृतदेहासोबत राहिला मुलगा; कारण ऐकून बसेल धक्का
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : अंत्यसंस्कार न करता तब्बल तीन महीने आईच्या मृतदेहासोबत राहिला मुलगा; कारण ऐकून बसेल धक्का

Viral News : अंत्यसंस्कार न करता तब्बल तीन महीने आईच्या मृतदेहासोबत राहिला मुलगा; कारण ऐकून बसेल धक्का

Oct 24, 2024 03:02 PM IST

Viral News : आसाममधील गुवाहाटी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी जयदीप देव हा त्याच्या आईसोबत राहत होता. त्याच्या आईचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. पण जयदीपने आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तिच्या मृतदेहासोबत राहिला.

अंत्यसंस्कार न करता तब्बल तीन महीने आईच्या मृतदेहासोबत राहिला मुलगा; कारण ऐकून बसेल धक्का
अंत्यसंस्कार न करता तब्बल तीन महीने आईच्या मृतदेहासोबत राहिला मुलगा; कारण ऐकून बसेल धक्का

Viral News : गुवाहाटी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जयदीप देव या ४० वर्षीय व्यक्तीची आई पौर्णिमा देवी यांचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. मात्र, जयदीप देवने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता त्यांचा मृतदेह हा घरीच ठेवला. याचे कारण ऐकून परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. आई पुन्हा जिवंत होईल या आशेने त्याने तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले नसल्याचं तपासात उघड झालं आहे. शेजाऱ्यांना पौर्णिमा देवी या बराच दिवसांपासून न दिसल्याने व त्यांच्या घराची ढासळती अवस्था पाहून त्यांनी चौकशी केल्यावर ही घटना उघडकीस आली आहे.

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. जयदीपच्या आईचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले होते, मात्र जयदीपने या बाबत शेजाऱ्यांना माहिती दिली नाही. पोलिसांनी शेजारी राहणाऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, जयदीप त्याच्या आईसाठी दररोज जेवण घेऊन येत होता. तसेच त्यांच्या घराबाहेर कचऱ्याचा ढीग देखील लागला होता. सुरवातीला त्यांना काही वाटले नाही. मात्र, तीन महीने होऊन पौर्णिमा देवी या दिसत नसल्याने शेजाऱ्यांनी जयदीप याला त्याच्या आईबद्दल विचारले असता त्याने आईचे निधन झाल्याचे सांगितले. त्यानंतर चिंताग्रस्त शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

घरात शिरल्यावर पोलीसही हादरले

पोलीस जयदीपच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना एका पलंगावर पौर्णिमा देवी यांचा सांगाडा आढळला. घराच्या आत पूजेचे साहित्य, भगवान शंकराचे चित्र, गवत आणि दिवा आढळला. या बद्दल पोलिसांनी जयदीपला विचारल्यावर त्याने सांगितले की, तो दररोज 'ओम नमः शिवाय'चा जप करायचा. यामुळे त्याची आई पुन्हा जिवंत होईल असा त्याला विश्वास होता.

मुलाला मानसिक आजार

पतीच्या मृत्यूनंतर पौर्णिमा देवी या त्यांचा मुलगा जयदीप सोबत राहत होत्या. त्यांचे पती निवृत्त रेल्वे अधिकारी होते आणि जयदीप त्यांच्या पेन्शनवर अवलंबून होता. तो नियमितपणे बँकेतून पैसे काढत असे. शेजाऱ्यांनी जयदीप हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगितले असून त्याच्या मानसिक अस्थिरतेमुळे त्याने आईचा मृत्यू इतका वेळ लपवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर