कर्नाटकमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांड सारखे मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कर्नाटक राज्यातील बागलकोटमध्ये एका तरुणाने आपल्या वडिलांची लोखंडी रॉडने हत्या करून त्यांच्या शरीराचे ३२ तुकडे केले. त्यानंतर आरोपीने वडिलांच्या शरीराचे तुकडे बोअरवेल मध्ये टाकले. हत्येचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा बोरवेलमधून शरीराचे तुकडे मिळाले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कर्नाटक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विठला कुलाली याने रागाच्या भरात वडील परशुराम कुलाली (५३) यांची लोखंडी रॉडने हत्या केली. ही घटना ६ डिसेंबर रोजी कर्नाटकमधील बागलकोटमध्ये घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीच्या मनाला पाझर फुटला नाही. त्याने जन्मदात्या वडिलांच्या शरीराचे ३२ तुकडे केले व ते तुकडे शेतातील खुल्या बोअरवेलमध्ये टाकले.
पोलिसांनी सांगितले की, परशुराम नेहमी दारूच्या नशेत आपल्या दोन मुलांपैकी छोट्या मुलगा विठला याला शिव्या देत होता. परशुराम यांची पत्नी आणि मोठा मुलगा वेगळे राहतात. मागील मंगळवारी विठलाला वडिलांनी शिव्या दिल्याने राग आला. त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत टाकले आहे.
संबंधित बातम्या