उत्तरप्रदेश राज्यातील अलीगड शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथील खैर पोलीस ठाणे परिसरात मंगळवारी एक कलयुगी मुलाने आपल्या आईला जिवंत जाळले. मुलाने लायटरने आईच्या साडीला आग लावली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पोलीस ठाण्यातील कर्मचारी तिला वाचवण्यासाठी धावले मात्र महिलेला वाचवताना त्यांचाही हात भाजला. महिलेला गंभीर अवस्थेत जेएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण घटनाक्रम पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
एसएसपी संजीव सुमन यांनी सांगितले की, ५० वर्षीय हेमलता यांचा आपल्या सासरच्या लोकांच्या ताब्यात असलेल्या जमिनीबाबत वाद सुरू होता. तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. याबाबत एक एफआयआर दाखल झाला होता. याबाबत आज दोन्ही बाजुच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यांच्यात घर व पैशावरून चर्चा सुरू होती, मात्र एकमत न झाल्याने महिला बाहेर गेली. त्यावेळी मुलाने लायटरने तिला आग लावली. पोलीस मुलाला थांबवूपर्यंत त्याने आपल्या आईला आग लावली होती. पोलिसांनी आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचे हात भाजले. महिलेला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. हॉक्टरांनी सांगितले की, महिला जवळपास ६० टक्के भाजली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या कुटूंबीयांनी जर कोणावर आरोप केले तर यावर कारवाई केली जाईल. महिला याआधीही एक-दोन वेळे पोलीस ठाण्यात आली आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतर समजले की, या कुटूंबात जमिनीचा वाद सुरू आहे.
मुलाने आईला आग लावून दुसऱ्या पक्षावर आरोप करण्याची योजना आखली होती. मुलगा घर रिकामे करण्यासाठी १० लाख रुपये मागत होता. तर आईचे सासरचे लोक ५ लाख रुपये देण्यास तयार झाले होते.
लग्नाच्या दिवशीच चोरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या तरुणाचा मध्य प्रदेशातील गुना येथे पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. यामुळे या तरुणाच्या कुटूंबाने सरकारी कार्यालयात येऊन आक्रोश केला. मृताच्या कुटूंबातील महिलांनी न्याय करण्याची मागणी करत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळ घातला. महिलांनी संतापाच्या भरात आपले कपडेही काढून फेकले. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालून कसे तरी त्यांना परत पाठवले. जिल्हाधिकारी डॉ. सतेंद्र सिंह यांनी याप्रकरणाचा योग्य तपास करण्याचा तसेच दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
संबंधित बातम्या