पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेनंतर राज्यसभेत बुधवारी भाषण दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर येणाऱ्या पाच वर्षात काय-काय विकास होणार, याचा रोडमॅप सांगितला. मोदींनी दावा केला की, तिसऱ्या कार्यकाळात सोलर पॉवरमुळे वीज बिल शून्य होईल, देशात बुलट ट्रेन पहिल्यांदाच धावेल, पीएम मोदींनी राज्यसभेत म्हटले की, मोदी ३.० मध्ये विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावली जाईल. पुढच्या पाच वर्षात डॉक्टरांची संख्या अनेक पटींनी वाढवली जाईल. मेडिकल कॉलेजची संख्या वाढवली जाईल. देशात उपचार खुपच स्वस्त व सुलभ होईल. पाच वर्षात प्रत्येक गरीबाच्या घरी पाण्याचा नळ असेल.
राज्यसभेत केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्या सरकारचा ३.० सुरू होणार आहे. या काळात विकासाचा वेग आम्ही कमी होऊ देणार नाही. आमची तिसरी टर्म आता दूर नाही. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढेल, सर्व कामे वेगाने सुरू राहतील. AI भारतात सर्वाधिक वापरले जाईल, येत्या ५ वर्षांत देशाला बुलेट ट्रेनची भेट मिळेल, येत्या ५ वर्षात प्रत्येक घराला पाईपलाईनद्वारे गॅस दिला जाईल, देशातील गरिबांसाठी पक्की घरे बांधणे सुरुच राहणार, देशातील गरिबांना मोफत धान्य देणे, मोफत उपचार देणे सुरुच राहील.
जेव्हा आपण म्हणतो की, २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, तेव्हा विरोधक म्हणतात, मग ८० कोटी लोकांना मोफत धान्य का देता? तर, त्यांना पुन्हा संकटाचा सामना करावा लागू नये, ते पुन्हा गरिबीत जाऊ नयेत, म्हणून आम्ही ही योजना देत आहोत. यापुढेही आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातील गरिबांला धान्य देत राहू.
संबंधित बातम्या