मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bengaluru : सिगारेटच्या अ‍ॅशने केला घात! राख फेकण्यासाठी गेलेल्या तरुण अभियंत्याचा ३३ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Bengaluru : सिगारेटच्या अ‍ॅशने केला घात! राख फेकण्यासाठी गेलेल्या तरुण अभियंत्याचा ३३ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Jan 01, 2024 10:52 AM IST

Bengaluru boy fell from the 33rd floor : बंगळुरू येथे एका तरुण अभियंत्याचा सिगारेटची राख फेकतांना तब्बल ३३ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

Bengaluru boy fell from the 33rd floor
Bengaluru boy fell from the 33rd floor

Bengaluru boy fell from the 33rd floor : बंगळुरू येथे धक्कादायक घटना उघडकीस अलायी आहे. एका तरुण अभियंत्याला सिगारेटची राख बाल्कनीतून खाली फेकणे जिवावर बेतले आहेत. २७ वर्षीय अभियंता हा पार्टी करण्यासाठी मित्राच्या फ्लॅटवर गेला होता. रात्री उशीरापर्यंत सेलिब्रेशन सुरू असतांना तो सिगारेटची अ‍ॅश फेकण्यासाठी बाहेर बाल्कनीत गेला. यावेळी त्याचा तोल गेल्याने तब्बल ३३ व्या मजल्यावरून खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बंगळुरुतील पश्चिम भागात घडली आहे.

Maharashtra Weather update: नव्या वर्षात राज्यात ढगाळ हवामान; कुठे पाऊस तर कुठे गारठा, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय ?

दिव्यांशू शर्मा (वय २७) असे मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी घडली. दिव्यांशु हा मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. केआर पुरममधील पश्मिना वॉटरफ्रंट अपार्टमेंटममध्ये त्याची मैत्रिण मोनिकाच्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली, यावेळी तो त्याचा मित्र आणि मैत्रीण हे नवे वर्ष साजरे करणार होते.

Mumbai murder : संपत्ती विकण्याच्या वादातून पतीने पत्नीची केली हत्या, तर भावावरही प्राणघातक हल्ला

दिव्यांशु हा सिगारेटची राख टाकण्यासाठी बाल्कनीत गेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मोनिका, दिव्यांशु आणि दुसरा मित्र एका पबमध्ये गेले आणि पहाटे अडीचच्या सुमारास घरी परतले. जेव्हा मित्र बेडरूममध्ये जाऊन झोपला. तर दिव्यांशु दिवाणखान्यात झोपला. सकाळी सातच्या सुमारास, बाकी सगळे झोपलेले असताना, दिव्यांशुने घर साफ केले आणि तो सिगारेटची राख फेकण्यासाठी बाल्कनीत गेला. यावेळी त्याचा तोल गेला असावा आणि तो खाली पडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

ट्रेंडिंग न्यूज

काही रहिवाशांनी सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर या संदर्भात मेसेज टाकले. मेसेज पाहिल्यानंतर मोनिका तिच्या मैत्रिणीसह दिव्यांशुच्या शोधात निघाले. वॉकिंग ट्रॅकजवळ दिव्यांशुचा मृतदेह पडलेला असल्याचे मोनिकाने पाहिले. या घटनेमुळे तिला मोठा धक्का.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशूचे वडील भारतीय हवाई दलाचे निवृत्त आहेत. ते कुटुंबातील इतर सदस्यांसह होरामावू येथे राहतात. गुरुवारी रात्री दिव्यांशु आणि इतर तीन मित्र मोनिकाच्या दुसर्‍या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेले, तिथे त्यांनी एकत्र चित्रपट पाहण्याचा बेत आखला. चित्रपट पाहिल्यानंतर ते पबमध्ये गेले आणि रात्री उशिरा परतले.

WhatsApp channel
विभाग