मामा राहुल गांधीसह प्रियंका गांधींच्या मुलाचा घर रंगवतानाचा व्हिडिओ व्हायरल! काँग्रेसकडून रेहान वाड्राचं सॉफ्ट लाँचिंग ?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मामा राहुल गांधीसह प्रियंका गांधींच्या मुलाचा घर रंगवतानाचा व्हिडिओ व्हायरल! काँग्रेसकडून रेहान वाड्राचं सॉफ्ट लाँचिंग ?

मामा राहुल गांधीसह प्रियंका गांधींच्या मुलाचा घर रंगवतानाचा व्हिडिओ व्हायरल! काँग्रेसकडून रेहान वाड्राचं सॉफ्ट लाँचिंग ?

Nov 02, 2024 10:49 AM IST

rahul gandhi showcases nephew raihan in diwali : नेहरू-गांधी-वढेरा कुटुंबातील पाचव्या पिढीतील सदस्याचे सॉफ्ट लाँच म्हणून काँग्रेसचे समर्थक आणि विरोधक या व्हिडिओकडे पाहत आहेत. रेहानची आई प्रियांका गांधी या वायनाडमधून निवडणूक लढवत असताना हा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.

मामा राहुल गांधीसह आजीचं घर रंगवतानाचा व्हिडिओ व्हायरल! काँग्रेसकडून रेहान वाड्राचं सॉफ्ट लाँचिंग ?
मामा राहुल गांधीसह आजीचं घर रंगवतानाचा व्हिडिओ व्हायरल! काँग्रेसकडून रेहान वाड्राचं सॉफ्ट लाँचिंग ?

rahul gandhi showcases nephew raihan in diwali : सध्या राज्यात विधानसभा  निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर वायनाड येथून पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी या मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान, देशात दिवाळीचीही धामधूम सुरू असून या धामधुमीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भाच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर उपलोड केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

  दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सोशल मीडियावर राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ते त्यांचा भाचा  रेहान राजीव वाड्रा यांच्यासोबत दिसत आहेत. रेहान हा राहून गांधी सोबत त्याच्या आजीचे घर रंगवताना व्हिडिओत दिसत आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावर त्याची ओळख होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रेहान हे वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणाऱ्या प्रियांका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वढेरा यांचे चिरंजीव आहेत. ते काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नातू आहेत. या व्हिडिओमध्ये रेहान आपल्या आजीच्या १० जनपथ येथील सरकारी निवासस्थाच्या भिंती रंगवताना दिसत आहेत.   

 नेहरू-गांधी-वढेरा कुटुंबातील पाचव्या पिढीतील सदस्याचे सॉफ्ट लाँचिंग ? 

नेहरू-गांधी-वढेरा कुटुंबातील पाचव्या पिढीतील सदस्याचे सॉफ्ट लाँच म्हणून काँग्रेसचे समर्थक आणि विरोधक या व्हिडिओकडे पाहत आहेत. रेहानची आई प्रियांका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवत असताना हा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी ही जागा सोडल्यानंतर आता काँग्रेसने प्रियांका गांधी यांना या जागेवर उमेदवारी दिली आहे.

रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या ९  मिनिटांच्या व्हिडिओसह लिहिले की, "त्यांच्यासोबत एक दिवाळी, ज्यांच्या मेहनतीने भारत उजळून निघतो!" यावेळी राहुल आपल्या भाच्याशी संवाद साधतांना दिसत आहे. यात ते रेहान याला सांगतात की, सहसा आपण दिवाळी साजरी करतो, पण घरात प्रकाश आणणाऱ्यांना आपण कधीच भेटत नाही. आपण त्यांच्याशी कधीच बोलत नाही. आपल्याला त्यांचं आयुष्य कळत नाही. त्यामुळं मला वाटलं की यंदा दिवाळी साजरी करण्यापूर्वी मी अशाशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या समजून घेईन. 

यानंतर राहुल गांधी हे रेहानसोबत भिंत रंगवण्याचे काम करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओत राहुल एका दिवे तयार करणाऱ्या कुटुंबातील महिलेशी भेटून तिच्याशी संवाद साधताना दिसत आहे. राहून गांधी यांनी या महिलेसोबत मातीचे दिवे बनवताना देखील दिसत आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, या लोकांसोबत वेळ घालवून एक संस्मरणीय दिवाळी साजरी केली. रंगकाम करणाऱ्या बांधवांसोबत काम करून व कुंभार कुटुंबासोबत मातीचे दिवे बनवून मी कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी दिवाळी साजरी केली. मी त्यांचे काम बारकाईने पाहिले, त्यांचे कौशल्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या अडचणी आणि समस्या देखील समजून घेतल्या. जेव्हा आपण सण आनंदाने साजरे करतो तेव्हा काही पैसे कमावण्यासाठी ते आपले गाव, शहर आणि कुटुंब सोडून स्वत:चा आनंद विसरतात.

कोण आहेत रेहान वाड्रा ?

राजीव वाड्रा यांच्या वेबसाईटनुसार, २४ वर्षीय रेहान व्हिज्युअल आर्टिस्ट आणि क्युरेटर आहे. वेबसाइटनुसार, रेहानचे व्हिज्युअल वर्क वन्यजीव ते व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. रेहान यांनी नवी दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांनी त्यांच्या फोटोंचे प्रदर्शने भरवली आहेत. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी रेहानला भारतीय सण दिवाळी कशा पद्धतीने नागरिक साजरी करतात याची माहिती देतांना दिसत आहेत. रेहान देखील राहून गांधी यांना मदत करताना दिसत आहे. राहून गांधी हे १०, जनपथ बंगल्यात रंगकाम करणारे मजूर यांना मदत करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. १०, जनपथ हे सोनिया गांधी यांचे निवासस्थान असून २०२३ मध्ये खासदार म्हणून अपात्र ठरल्यापासून राहुल येथे वास्तव्यास आहेत.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर