Instagram crash : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम काल रात्री पुन्हा बंद झाले होते. मेटाच्या मालकीच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना रात्री अनेक अडचणींचा सामना करवा लागला. ही समस्या भारतासह जगभरातील युजर्सनी अनुभवली. या बाबत इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर चालू असलेल्या आउटेजची तक्रार करण्यास सुरुवात केली. X वरील अनेक वापरकर्त्यांनी त्यांना Instagram ॲप वापरण्यात अनेक अडचणी येत असल्याची माहिती दिली. काही जण इंस्टाग्रामवर लॉग इन करू शकत नव्हते तर काहींना कॉमेंट्स लिहिता आणि वाचता येत नव्हत्या.
Downdetector च्या मते, सुमारे २१ टक्के वापरकर्त्यांनी असे मत नोंदवले आहे की त्यांना Instagram ॲपमध्ये उघडण्यास अनेक समस्या येत आहे. सुमारे ६९ टक्के लोकांना लॉग इन करण्यात समस्या येत होत्या. रिपोर्टनुसार, काल सकाळपासून ही समस्या सुरू असून रात्री पर्यंत यूजर्सना इन्स्टाग्राम वापरण्यास अनेक अडचणी येत होत्या.
Downdetector च्या मते, दिल्ली, लखनौ, जयपूर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, पाटणा यांसारख्या शहरांतील वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागला. मार्चच्या सुरुवातीला फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाले होते. त्यामुळे लोक त्यांच्या खात्यात लॉग इन करू शकले नव्हते. पण आता दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरळीत चालू आहेत. त्याचा परिणाम भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिसून आला.
फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्ते अनेक समस्या नोंदवत होते, जसे की त्यांच्या Facebook खात्यातून लॉग आउट होणे, परत लॉग इन करणे अशक्य झाले. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम वापरकर्ते त्यांचे फीड रिफ्रेश करू शकले नाहीत.