Viral News : रुग्णालयात बेडवर पडलेला ८५ वर्षीय प्रियकर, तरुणी डान्स करत म्हणते, संपत्तीचे इच्छापत्र मिळाले
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : रुग्णालयात बेडवर पडलेला ८५ वर्षीय प्रियकर, तरुणी डान्स करत म्हणते, संपत्तीचे इच्छापत्र मिळाले

Viral News : रुग्णालयात बेडवर पडलेला ८५ वर्षीय प्रियकर, तरुणी डान्स करत म्हणते, संपत्तीचे इच्छापत्र मिळाले

Dec 07, 2024 06:08 PM IST

Viral News : ब्रॉन्विन अरोरा यांचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर इंटरनेट युजर्स संतापले असून अशा कृत्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. लोकांनी याला वृद्ध व्यक्तीबद्दल वाईट वर्तन म्हटले आहे.

टिकटॉक स्टारचा व्हायरल झालेला व्हिडिओ
टिकटॉक स्टारचा व्हायरल झालेला व्हिडिओ

सोशल मीडियावर अनेकदा विचित्र प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशीच एक क्लिप सध्या खूप शेअर केली जात आहे. यात हॉस्पिटलमधील बेडवर वृद्ध व्यक्ती पडलेला दिसत असून त्याची प्रेयसी त्याच्यासमोर नाचताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, ब्रॉन्विन अरोरा नावाची ही मुलगी कॅनडाच्या टोरंटोची आहे, जी टिकटॉकवर बरीच लोकप्रिय आहे. अरोरा हिचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर इंटरनेट युजर्स संतापले असून अशा कृत्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. लोकांनी याला वृद्ध व्यक्तीबद्दल वाईट वर्तन म्हटले आहे.

एक्सवर व्हिडिओ शेअर करताना एका व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पाश्चिमात्य देशांचा उदारमतवादी समाज खूप वाईट झाला आहे. व्हायरल क्लिपमध्ये ही महिला काळ्या रंगाची जीन्स आणि टॅन टॉप घालून रुग्णालयात पडलेल्या एका व्यक्तीसमोर डान्स करताना दिसत आहे. टिकटॉकवर हा व्हिडिओ शेअर करताना ब्रॉन्विन अरोरा यांनी कॅप्शनमध्ये असे काही लिहिलं आहे की, ते वाचून लोकांचा संताप अनावर झाला आहे. मुलीने अतिशय कुरूप विनोद करत लिहिलं, ‘मित्रांनो, इच्छापत्र सापडलं आहे. आता प्लग काढू का?’

इंटरनेट यूजर्सनी केले ट्रोल -

ही मुलगी अनेकदा तिचे वय आणि बॉयफ्रेंडमधील फरकाबद्दल विनोद करत असते. पण यावेळी तिची कृती तिच्या अंगलट आली आहे. ब्रॉन्विन अरोरा यांच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका एक्स युजरने त्याच्या वागण्यावर टीका करत परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्यायला हवं असं लिहिलं आहे. हे पूर्णपणे चुकीचे आणि अपमानास्पद आहे. 

आणखी एका युजरने कमेंट केली की, "मी या वर्षी पाहिलेली ही सर्वात वाईट गोष्ट आहे." त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या मुलीला फक्त पैशांची काळजी आहे का, असा प्रश्न आणखी एका व्यक्तीने उपस्थित केला. अशाच प्रकारच्या आणखी काही कमेंट्स आल्या आहेत ज्यात टिकटॉकरसाठी अनेक वाईट गोष्टी बोलल्या गेल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर