Viral news : तुम्ही छोटीसी बात हा चित्रपट पाहिला असेल. यात चित्रपटातील हीरो असलेले अमोल पालेकर यांचं मुख्य अभिनेत्रीवर प्रेम असतं. पण, त्यांच्यात तिला ते सांगण्याचं धैर्य नसतं. यावेळी त्यांची चित्रपटात लव्ह गुरु अशोक सराफ यांच्या सोबत भेट होते. अशोक सराफ अमोल पालेकर यांना असे ट्रेन करतात की त्यांच्या व्यक्तिमत्वात मोठे बदल होतात आणि मुख्य अभिनेत्रीच त्यांच्या प्रेमात पडते. हा झाला चित्रपटातील किस्सा. मात्र, चीनमध्ये देखील अशी एक लव्ह गुरु असून ही लव्ह गुरु सध्या चांगलीच चर्चा आहे. ही लव्ह गुरु श्रीमंत व्यक्तींना कसे पटवायचे याचे प्रशिक्षण देते. या साठी ती कोचिंग क्लास घेत असून सध्या तिची चांगलीच चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे.
ले चुआनकू असे या लव्ह गुरू महिलेचं नाव आहे. ही महिला महिलांना श्रीमंत पुरुषांना पटवून त्यांच्याशी लग्न करण्यासाठीचे सल्ले आणि प्रशिक्षण देते. रिपोर्ट्सनुसार या कामातून ही महिला दरवर्षी १६३ कोटी रुपये कमावत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ले चुआनकूला या कामामुळे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे, तरी देखील ती तिच्या फॉलोअर्सना विविध मार्गाने मदत करत आहे.
ले चुआनकून ही लाईव्ह व्हिडिओ आणि आणि व्हिडिओच्या माध्यमातून तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून क्लास घेऊन महिलांना श्रीमंत पुरुषांना त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न कसे करावे या बाबत प्रशिक्षण देते. चुआनकूचे अनेक सल्ल्यांमुळे अनेक डा अनेक वाद झाले आहेत. करण तिच्या टिप्समुळे नात्यांमधील अनैतिकतेला प्रोत्साहन देतात, असे काही जणांचे म्हणणे आहे.
चुआंकूचा असा विश्वास आहे की सर्व नातेसंबंध प्रामुख्याने पैसे आणि फायद्यांच्या तोट्यावर अवलंबून असतात. अनेक नाते ही व्यावहारिक असतात. प्रत्येक गोष्टीचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला पाहिजे, असे तिने आपल्या एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. चुआंकू लाइव्ह स्ट्रीम दरम्यान सल्ल्यासाठी १२,९४५ रुपये आकारते तर तिचा सर्वात लोकप्रिय कोचिंग क्लाससाठी ती ४३,१७९ रुपये आकारते.
चुआंकूच्या मते नातेसंबंध पैसा आणि नफा या व्यावहारिक तत्वावर आधारित असतात. चुआंकूच्या या विचारसरणीमुळे समाजात अनेक नैतिक प्रश्न निर्माण होतात. तीच्या या विचारसरणीवर अनेकांनी टीका केली आहे. असे असले तरी तिचा फॅन फॉलोअरची संख्या खूप मोठी आहे.
संबंधित बातम्या