VIRAl VIDEO: ट्रम्प यांच्यावर गोळी झाडताच काही क्षणात सुरक्षा स्नायपरनं हल्लेखोर शूटरला ठार मारलं; नेम पाहून व्हाल थक्क
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIRAl VIDEO: ट्रम्प यांच्यावर गोळी झाडताच काही क्षणात सुरक्षा स्नायपरनं हल्लेखोर शूटरला ठार मारलं; नेम पाहून व्हाल थक्क

VIRAl VIDEO: ट्रम्प यांच्यावर गोळी झाडताच काही क्षणात सुरक्षा स्नायपरनं हल्लेखोर शूटरला ठार मारलं; नेम पाहून व्हाल थक्क

Published Jul 14, 2024 12:45 PM IST

Donald Trump Attack :अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आला आहे. तसेच हल्लेखोर व्यक्तीची ओळख पटली असून काही क्षणात हल्लेखोराला सुरक्षा रक्षक स्नायपरनं नेम धरून ठार मारलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ट्रम्प यांच्यावर गोळी झाडताच काही क्षणात सुरक्षा स्नायपरनं हल्लेखोर शूटरला ठार मारलं; नेम पाहून व्हाल थक्क
ट्रम्प यांच्यावर गोळी झाडताच काही क्षणात सुरक्षा स्नायपरनं हल्लेखोर शूटरला ठार मारलं; नेम पाहून व्हाल थक्क

Donald Trump Shooting Update : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचार रॅलीत गोळीबार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी झालेल्या या घटनेत एका शूटरन रॅली सुरू असलेल्या परिसरातील उंच इमारतीवरून हा हल्ला केला. यात ट्रम्प यांच्या कानाला एक गोळी चाटून केली आहे. यानंतर ट्रम्प यांच्या कानाजवळून रक्त वाहत होतं. सुरक्षा रक्षकांना हल्लेखोर शूटर दिसताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या एका स्नायपरनं लांब अंतरावर असणाऱ्या हल्लेखोराला ठार मारलं. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून तो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

अमेरिकेत आज एक खळबळ जनक घटना घडली आहे. आगामी राष्ट्रपती निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर प्रचार सभेत गोळीबार करण्यात आला. शनिवारी संध्याकाळी ६.२ मिनिटांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पेनसिल्व्हेनियाच्या बटलरमधील एका मैदानात रॅलीला संबोधित करत असतांना त्याच्यावर एका लांब आणि उंच इमारतीवर बसलेल्या एका शार्प शूटरने गोळीबार केला. मात्र, पुढच्याच सेकंदात डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या स्नायपरने शूटरला ठार केले.

अमेरिकेत बेकायदेशीरित्या आलेल्या परदेशी नागरिकांबद्दल अध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणांवर टीका करत असतांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. यातील एक गोळी ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. यावेळी सीक्रेट सर्व्हिस एजंट्स त्यांच्या दिशेने धाव थेट त्यांना सुरक्षित केले. तर याच वेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या स्नायपरने शूटरला ठार मारले. डोनाल्ड ट्रम्पवर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून थॉमस मॅथ्यू (वय २०) असे त्याचे नाव आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना त्याला का मारायचे होते हा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

डोनाल्ड ट्रम्प खाली वाकताच सुरक्षा एजंट्सनी ट्रम्प यांना घेरले. ट्रम्प यांच्या कानातून रक्तस्त्राव होत असल्याने त्यांनी त्यांना स्टेजच्या डाव्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी डोनाल्ड ट्रम्प "थांबा, थांबा, थांबा म्हणाले. त्यानंतर त्यांनी गर्दीच्या दिशेने हवेत मुठ उंचावली आणि "लढा" म्हणत जनतेला आवाहन केले. त्यानंतर एजंटांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पायऱ्यांवरून खाली उतरवून एका काळ्या एसयूव्हीमध्ये बसवले.

स्थानिक जिल्हा वकिलांनी सांगितले की, हल्लेखोर आणि रॅलीतील सहभागी झालेल्याला ठार मारण्यात आले आहे. हल्ल्यानंतर लगेचच जारी करण्यात आलेल्या निवेदनात अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे हा खुनाचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

बटलर हे १३ हजार लोकांचे शहर आहे जे पश्चिम पेनसिल्व्हेनियामधील पिट्सबर्गच्या उत्तरेस ३३ मैल अंतरावर वसले आहे. २०१६ मध्ये ट्रम्प यांना अध्यक्ष बनवण्यात या शहराने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बीव्हर काउंटीचे उपाध्यक्ष रिको एलमोर हे रॅलीत खास पाहुण्यांसाठी बनवलेल्या जागेवर बसले असताना त्यांना गोळीबाराचा आवाज आला. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे फटाके नसून बंदुकीच्या गोळ्या आहेत. म्हणून मी ओरडले असे ते म्हणाले.

एलमोरने कोणीतरी पॅरामेडिक्ससाठी कॉल करताना ऐकले. एलमोर हे वैद्यकीय व्यावसायिक नव्हते पण लष्करात सेवा करत असताना त्यांना प्रथमोपचार आणि सीबीआरचे व्यवस्थापन कसे करावे हे माहित होते. बॅरिकेड ओलांडून ते जखमी व्यक्तीजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्याच्या कपाळावर गोळी लागली होती व त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलीस आणि सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी रॅलीच्या ठिकाणाहून सर्वांना बाहेर काढले.

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या छतावरून झाडली गोळी

हल्लेखोर मॅथ्यू हा एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर बसून होता. त्याने तिथून ट्रम्प यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. सुदैवाने ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेली. यानंतर ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, बेथेल पार्क पेन्सिलवेनियात राहणाऱ्या थॉमस मॅथ्यू क्रुक्सने ट्रम्प यांच्यावर गोळी चालवली. त्याची ओळख पातळी आहे. रॅलीच्या स्टेजपासून १३० यार्डवर हल्लेखोर लपून बसला होता. मात्र, त्याने गोळ्या झाडल्यानंतर काही क्षणातच सीक्रेट सर्विसच्या स्नायपरने मॅथ्यूला ठार मारले. हल्लेखोरांकडे एआर स्टाइल रायफल मिळाली. या बंदुकीतून त्याने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केल्याचं स्पष्ट झालं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर