जगात सर्वात सुरक्षित ठिकाण कोणते असेल तर ते म्हणजे माणसाचे घर. घरातील कोणत्याही भागात तुम्ही कोणताही भीती न बाळगता झोपू शकतो. मात्र जरा विचार करा जर घरातच जर तुमच्यासाठी धोका असेल तर काय कारणार? एक असाच काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येत आहे.
इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये दिसते की, किंग कोब्रा फ्रिजच्या मागे असलेल्या जाळीमध्ये लपून बसला होता. सर्पमित्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना तो त्याच्या अंगावर फना काढताना दिसत आहे. तर कधी फ्रिजच्या खाली ट्रेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो तर कधी हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या मुश्किलीने या नागाला रेस्क्यू करण्यात आला.
व्हिडिओमध्ये दिसते की, फ्रीजच्या मागे लपलेल्या नागाला पकडण्यासाठी आलेल्या सर्पमित्राच्या अंगावर नाग झेप घेण्याचाही प्रयत्न करत आहे. मोठ्या शिताफीने सर्पमित्र सापाला पकडून पिशवीत बंद करतो.
सर्पमित्र आकाश जाधव या अकांउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावर नेटीझन्सनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी घरातील फ्रीज वापरताना तसेच किचनमध्ये काम करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच काही जणांनी त्या सर्पमित्राच्या धाडसाचे कौतुकही केले आहे.आतापर्यंत या व्हिडिओला आतापर्यंत १७३,९७४ लोकांनी लाईक्स केले आहे. काहीयूजर यावरहर हर महादेव लिहित आहेत.