मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Elvish Yadav Arrested: 'बिग बॉस' विजेता एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप

Elvish Yadav Arrested: 'बिग बॉस' विजेता एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 17, 2024 04:51 PM IST

Elvish Yadav Arrested Snake Venom Case: रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी बिग बॉस विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे.

Elvish Yadav
Elvish Yadav

Elvish Yadav Arrested: रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी बिग बॉस विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नोएडा पोलिसांच्या पथकाने रविवारी एल्विश यादवला चौकशीसाठी बोलावले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. पीपल्स इन्स्टिट्यूट फॉर ॲनिमल्सने एल्विश यादवसह सहा जणांवर सापाचे विष पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एल्विश यादवला न्यायालयात हजर केले जात असून कोतवाली सेक्टर- २० पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मनेका गांधी यांच्या पीपल्स फॉर अॅनिमल्सच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नोएडाच्या सेक्टर ५१ मध्ये एका पार्टीसाठी सापाचे विष पुरवल्याप्रकरणी युट्यूबर एल्विश यादवसह सहा जणांवर वन्यजीव कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२० ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात एल्विशच्या भूमिकेचा तपास केला जात आहे.

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात कोरेगाव पार्क येथे आढळला पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह

फॉरेन्सिक तपासणीत रेव्ह पार्टीत जप्त करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये कोब्रा आणि क्रेट प्रजातीच्या सापांच्या विषाचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. दुर्मिळ प्राण्यांच्या गैरवापराचा पर्दाफाश करण्यासाठी पीपल फॉर अॅनिमल्सने स्टिंग ऑपरेशन केले. 'पीपल फॉर अॅनिमल्स'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या पार्टीत नऊ साप सापडले. नऊपैकी आठ सापांचे दात गायब असल्याचे समजत आहे. याप्रकरणात एल्विश यादवची या प्रकरणासंदर्भात अनेकदा चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांने प्रत्येकी वेळी त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले.

रेव्ह पार्टीचे प्रकरण गेल्या वर्षी ३ नोव्हेंबरचे आहे. नोएडा सेक्टर ५१ मधील एका बँक्वेट हॉलमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या पार्टीला एल्विश पार्टीला उपस्थित नव्हता. परंतु, एल्विश यानेच रेव्ह पार्टीत सापाच्या विषाची व्यवस्था करून दिली होती, असा आरोप करण्यात आला.

IPL_Entry_Point

विभाग