Viral Video : चालत्या ट्रेनच्या एसी डब्यात दिसला विषारी साप, पुढं काय घडलं? पाहा व्हिडिओ!-snake spotted inside ac coach of jabalpur mumbai garib rath express ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : चालत्या ट्रेनच्या एसी डब्यात दिसला विषारी साप, पुढं काय घडलं? पाहा व्हिडिओ!

Viral Video : चालत्या ट्रेनच्या एसी डब्यात दिसला विषारी साप, पुढं काय घडलं? पाहा व्हिडिओ!

Sep 23, 2024 12:25 PM IST

Snake spotted in Train: जबलपूर- मुंबई गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये अचानक विषारी साप दिसल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चालत्या ट्रेनमध्ये सापडला विषारी साप
चालत्या ट्रेनमध्ये सापडला विषारी साप

Viral News: जबलपूर-मुंबई गरीब रथ एक्सप्रेसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गरीब रथ एक्सप्रेस १२१८७ मध्ये अचानक विषारी साप दिसला. ही ट्रेन सायंकाळी ७.५० वाजता जबलपूरहून मुंबई शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात होती. मात्र, भुसावळ ते कसारा स्थानकादरम्यान गरीब रथ एक्स्प्रेसच्या एससी कोच जी १७ मध्ये २३ च्या वरच्या सीटच्या बाजूला ५ फूट लांब साप लटकलेला दिसला. 

सुरुवातीला प्रवाशांना कळले नाही. मात्र, यादरम्यान एका प्रवाशाने साप पाहून दुसऱ्या सहकाऱ्याला सांगितले. प्रवाशांना साप पाहताच त्यांच्यात घबराट पसरली आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला. डब्यात भीतीचे वातावरण असून प्रवाशांनी कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यावेळी काही प्रवाशांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाजूला वरच्या सीटवर एक साप लटकलेला दिसत आहे. तर, प्रवासी देखील घाबरलेले दिसत आहेत. रेल्वे प्रशासनाने ट्रेन मध्यंतरी थांबवून प्रवाशांना दुसऱ्या डब्यात पाठवले. तसेच जी १७ कोचला कुलूप लावले. हा साप नेमका कुठून आला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

रेल्वेने दिले असे स्पष्टीकरण

पश्चिम मध्य रेल्वे झोनचे सीपीआरओ हर्षित श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘साप बाहेर आल्याची घटना समोर आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कसारा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. रेल्वे कर्मचारी नियमितपणे बोगी साफ केली जाते’, असेही त्यांनी म्हटले.

दारूच्या नशेत किंग कोब्राशी मस्ती

सोशल मीडियावर सापाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात एक व्यक्ती दारूच्या नशेत विषारी कोब्राशी खेळताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फुटेजला १६.८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ऑनलाइन प्रतिक्रियांची लाट उसळली आहे. काकी व्यंकटेश या इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात दारूची बाटली घेऊन झाडाखाली बसलेली दिसत आहे. तर, त्याच्यासमोर किंग कोब्रा दिसत आहे. संबंधित व्यक्ती पाळीव प्राण्याप्रमाणे किंग कोब्राशी खेळताना दिसत आहे. तसेच हा साप त्याला चावणार नाही, अशी ग्वाही तो कॅमेऱ्यासमोर असलेल्या कोणाला तरी बोलत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

Whats_app_banner
विभाग