Viral Video: धावत्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये निघाला विषारी साप! प्रवाशांची उडाली घाबरगुंडी; व्हिडिओ व्हायरल-snake dangles from upper berth of mumbai bound garib rath express viral video ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: धावत्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये निघाला विषारी साप! प्रवाशांची उडाली घाबरगुंडी; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: धावत्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये निघाला विषारी साप! प्रवाशांची उडाली घाबरगुंडी; व्हिडिओ व्हायरल

Sep 24, 2024 12:30 PM IST

Garib Rath Express Train Viral Video : जबलपूर-मुंबई गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनच्या एसी कोचमध्ये वरच्या बर्थवर साप दिसल्याने खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

धावत्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये निघाला विषारी साप! प्रवाश्यांची उडाली घाबरगुंडी; व्हिडिओ व्हायरल
धावत्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये निघाला विषारी साप! प्रवाश्यांची उडाली घाबरगुंडी; व्हिडिओ व्हायरल

Garib Rath Express Train Viral Video : रेल्वेमध्ये तुम्ही झुरळ, मुंग्या आणि उंदीर असल्याच्या अनेक तक्रारी ऐकल्या असतील. किंवा प्रवासा दरम्यान, तुम्ही देखील या गोष्टी अनुभवल्या असतील. पण जर तुमच्या बर्थवर जर साप दिसला तर के होईल याची कल्पना करा. जबलपूरहून सुटणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे.

गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनच्या एसी डब्यात साप दिसल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ही घटना शनिवारी घडली जबलपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेस कसारा रेल्वे स्थानकाजवळ आली असता प्रवाशांना गाडीत साप दिसला. एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. कोच क्रमांक जी ३ च्या बर्थ क्रमांक २३ वर ही घटना घडली. साप पाहिल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ही ट्रेन शिवाजी टर्मिनलवर येताच प्रवाशांनी चांगलाच गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसह बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून सापाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रेस्क्यू पथकाला साप सापडला नाही. दरम्यान, ज्या डब्यात साप आढळला तो डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये

जबलपूर-मुंबई गरीब रथ एक्सप्रेस (१२१८७) मधील व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका कोचमध्ये एक मोठा कोब्रा साप एका बर्थवर फणा काढून बसला असल्याचं दिसत आहे. हा साप विषारी असल्याचं बोललं जात आहे. सापाला पाहून प्रवासी खूप घाबरले. काही प्रवासी तर सैरावैरा पळत असल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून, तो सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रवासी ओरडत व किंचाळत असल्याचे ऐकू येत आहे. प्रवाशांना साप दिसला तेव्हा रेल्वे ही सिग्नलमुळे कसारा रेल्वेस्थानकादरम्यान थांबली होती. हा साप एका बर्थवर फणा काढून बसला होता. यावेळी प्रवाशांनी ब्लँकेटद्वारे सापाला गुंडाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, साप एसी पॅनलमध्ये घुसल्याने कुणाला काहीही करता आले नाही. अखेर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दुसऱ्या बोगीत हलविले व साप असलेली बोगी लॉक केली.

काय म्हणाले अधिकारी ?

या घटनेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, स्टेशन सोडण्यापूर्वी ट्रेन यार्डात थांबते सध्या पावसाळा सुरू आहे. यावेळी साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात. असाच एक साप गाडीत घुसला असल्याची शक्यता आहे. सापाला पाहून प्रवासी घाबरून ट्रेनमध्ये बसून राहिले. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अरे भाई, हा श्रीमंत माणूस गरीब रथात कसा आला?' असे एका नेटकऱ्याने गमंती म्हटले आहे.

Whats_app_banner
विभाग