Viral Video : एसीतून निघाला साप! बाहेर येताच केली उंदराची शिकार; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ-snake came out from ac and hunt rat then dragged it inside ac viral video ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : एसीतून निघाला साप! बाहेर येताच केली उंदराची शिकार; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Viral Video : एसीतून निघाला साप! बाहेर येताच केली उंदराची शिकार; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Jan 25, 2024 05:24 PM IST

Viral Video : सोशल मिडियावरसध्या एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Video
Viral Video

snake Viral Video : सोशल मीडिया सध्या मनोरंजनाचे मोठे साधन झाले आहे. यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ थरकाप उडवणारे असतात. सद्य असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हीडिओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. एक भलामोठा साप एका एसीतून बाहेर येऊन त्यानं उंदराची शिकार केली. तसेच त्या उंदराला घेऊन परत तो एसीमध्ये जातांना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मीम शेअर करणाऱ्या @queburrada.ar असे या इन्स्टाग्राम पेजने हा व्हिडिओ शेकर केला आहे. एका घरात एक एसी असून या एसीत हा साप लपला होता. हा साप हळूहळू बाहेर येतांना दिसतो. एसीमधूनच लटकलेल्या अवस्थेत तो एका उंदराची शिकार करतो. आणि यानंतर तो पुन्हा उंदराला घेऊन एसीमध्ये शिरतो. या घटनेमुळे घरच्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली असावी असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तर हा साप घराच्या छतावरील तारेच्या सहाय्याने खाली एसीमध्ये केला असावा असे काहींनी म्हटले आहे. दरम्यान, साप एसीमध्ये लपला असला तरी शेवटी त्याला शिकार करण्यासाठी बाहेर यावेच लागले.

viral video : बीटेक झालेल्या मुलीने थारमध्ये लावला पाणीपुरी विक्रीचा स्टॉल! आनंद महिंद्रा व्हिडिओ शेअर करत म्हणाले....

हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तब्बल ४ लाख ८७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. तर ६०० पेक्षा अधिक लोकांना हा व्हिडिओ आवडला असून त्यांनी लाइक केला आहे.

साप आणि उंदराचा हा थरारक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अनेक जण शेअर आणि रिपोस्ट करत आहेत. या व्हिडीओवर मजेजीर कमेंट्स देत एका नेटकार्याने लिहिले आहे की, अशा प्रकारचा एसी मी पहिला नाही की ज्याच्या रिमोटमध्ये साप असून बटन दाबल्यावर तो उंदराची शिकार करतो. तर दुसऱ्याने थेट घराच्या भाड्यासंदर्भात बोलत त्याच्या मालकाची टर्र उडवली आहे. "आत्ता समजले की, या घराचे भाडे इतके स्वस्त कसे आहे. एकाने लिहिले आहे की सापाएवजी जर मांजर पाळली असती तरी काम झाले असते. तर एकाने लिहिले आहे की, तो साप असल्याचे समजायला १० सेकंद लागले. जर एसीची वेळेवर साफ सफाई केली असती तर असे झाले नसते असे एकाने पोस्ट केली आहे.

Whats_app_banner
विभाग