मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बाप रे! या तरुणाला दर आठवड्याला चावतोय साप, महिन्यात ५ वेळा सर्पदंश, मावशीच्या घरी गेल्यावरही घेतला चावा

बाप रे! या तरुणाला दर आठवड्याला चावतोय साप, महिन्यात ५ वेळा सर्पदंश, मावशीच्या घरी गेल्यावरही घेतला चावा

Jul 02, 2024 05:18 PM IST

snake bite : एका तरुणाला साप वारंवार दंश करत आहे. गेल्या ३० दिवसात सापाने तरुणाला तब्बल पाच वेळा चावा घेतला आहे. नातेवाईकांच्या घरी गेल्यावरही सापाने तरुणाचा पिच्छा सोडला नाही.

या तरुणाला दर आठवड्याला चावत आहे साप
या तरुणाला दर आठवड्याला चावत आहे साप

विश्वास करणे कठीण आहे मात्र हे सत्य आहे. उत्तरप्रदेश राज्यातील फतेहपूर सौरा गावातील २४ वर्षीय विकास दुबे या तरुणाला सापाने पछाडले आहे. साप दर आठवड्याला त्यांना दंश करत आहे. दर आठवड्यातील सात चावल्यानंतर उपचार करून विकास बरा होतो.  यानंतर विकास मावशीच्या घरी रहायला गेला तर तेथेही सापाने त्यांना दंश केला. मागील ३० दिवसांत त्यांना ५ वेळा सापाने चावा घेतला आहे.

विकास दुबे यांनी सांगितले की, पहिल्यांदा २ जून रोजी रात्री ९ वाजता सापाने चावा घेतला होता.त्यानंतर कुटूंबीयांनी त्यांना जवळच्या एका खासगी नर्सिंग होममध्ये घेऊन गेले. तेथे दोन दिवस उपचारानंतर ते बरे झाले. त्यानंतर कुटूंबीयांना वाटले की, घटना सामान्य आहे. मात्र १० जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पुन्हा सापाने दंश केला. त्यानंतर त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्यांदाही ते उपचारानंतर बरे झाले. त्यानंतर त्यांना मनात सापाची दहशत बसली व सतर्कता बाळगू लागले. मात्र सात दिवसानंतर १७ जून रोजी पुन्हा तशीच घटना घडली व घराच्या आतमध्येच सापाने पुन्हा चावा घेतला. बेशुद्ध पडल्यानंतर घरचे लोक पुन्हा त्यांना त्याच रुग्णालयात घेऊन गेले व उपचारानंतर बरे झाले.

ट्रेंडिंग न्यूज

चौथ्यांदा सापाने सात दिवसही होऊ दिले नाहीत, ४ दिवसातच सापाने पुन्हा दंश केला. उपचार करणारे डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले होते. यावेळीही तरुण उपचारानंतर वाचला. त्यानंतर नातेवाईक व डॉक्टरांनीही सल्ला दिला की, काही दिवस घरापासून दूर रहा. तरुण शहरात राहणाऱ्या आपल्या मावशीच्या घरी रहायला गेला.

मागील शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तेथेही सापाने त्याचा चावा घेतला. त्यानंतर त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जवाहरलाल यांनी सांगितले की, हा खूपच विचित्र प्रकार आहे. प्रत्येक वेळा त्याच्यावर अँटी स्नेक व्हेनम इंजेक्शन आणि इमरजन्सी औषधे देऊन उपचार केले जातात. ठीक होऊन तो घरी परततो व पुन्हा काही दिवसांनी त्याच्या शरीरावर क्लिअर स्नेक बाइटचे निशाण मिळतात. 

विकास दुबे या तरुणाने सांगितले की, सर्पदंशाच्या घटनेने तो त्रस्त झाला आहे. त्याला सापाची दहशत बसली असून प्रत्येक वेळा साप चावल्याचा भास होत आहेत. प्रत्येक वेळी उपचारासाठी पैसेही खर्च होत आहेत. दरम्यान विकासचे मामा कामतानाथ यांनी सांगितले की, आम्ही सर्वजण काळजीत पडलो आहे. जेव्हा सापाने विकासला तिसऱ्यांदा दंश केला त्यावेळी घरातील अनेक लोक तेथे उपस्थित होते. चावा घेऊन साप निघून गेला. खूप शोधले मात्र तो सापडला नाही.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर