मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वनप्लस नॉर्ड ३ झाला स्वस्त; २० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा दमदार कॅमेरा आणि प्रीमियम डिझाइनचा स्मार्टफोन!

वनप्लस नॉर्ड ३ झाला स्वस्त; २० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा दमदार कॅमेरा आणि प्रीमियम डिझाइनचा स्मार्टफोन!

Jun 15, 2024 09:20 PM IST

One Plus Nord 3: दमदार कॅमेरा सेटअप आणि प्रीमियम डिझाइनसह येणारा वनप्लस नॉर्ड ३ स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी ग्राहकांना मिळत आहे.

वनप्लस नॉर्ड ३ स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली.
वनप्लस नॉर्ड ३ स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली.

Smartphones Under 20000: स्मार्टफोन मार्केटमध्ये टेक कंपनी वनप्लसने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून आपल्या नॉर्ड लाइनअपचे फोन परवडणाऱ्या किमतीत खूप पसंत केले जात आहेत. आता वनप्लस नॉर्ड ३ मध्ये लेटेस्ट अपडेट म्हणून ऑक्सिजन ओएस १४.०.०.५२० देण्यात आला आहे. ज्यामुळे अनेक विद्यमान त्रुटी दूर झाल्या आहेत. याशिवाय लेटेस्ट अँड्रॉइड सिक्युरिटी पॅच देखील फोनचा भाग बनला आहे.

नवीन अपडेटसोबत करण्यात आलेल्या बदलांबद्दल बोलायचे झाले तर, युजर्स क्विक सेटिंग्जमध्येच व्हॉल्यूम अ‍ॅडजस्ट करण्याचा पर्याय आहे. युजर्स हवे तेव्हा फ्लोटिंग विंडोचा आकार बदलू शकतात. होम-स्क्रीन विजेट्स आता चांगले दिसतील आणि सिस्टम डेटा जास्त स्टोरेज स्पेस घेणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

ऑक्सिजनओएस १४.०.०.५२० अपडेट जून २०२४ पासून वनप्लस नॉर्ड ३ वापरकर्त्यांसाठी नवीनतम सुरक्षा पॅच आणते. याशिवाय काही युजर्सना एनएफसी बेस्ड पेमेंट करण्यात अडचण येत होती, ती त्रुटी आता दूर करण्यात आली आहे. याशिवाय, डिव्हाइसच्या व्हायब्रेशनशी संबंधित समस्याही दूर करण्यात आल्या असून युजर्सना या फोनमधून चांगली गेमिंग स्टेबिलिटीही मिळणार आहे.

भारतीय बाजारपेठेत २५,००० रुपयांच्या आसपास किंमतीत लाँच करण्यात आलेला वनप्लस नॉर्ड ३ ५जी कंपनीच्या वेबसाइट आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर केवळ १९,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. फोनवरील इतर बँक आणि एक्सचेंज ऑफर्स स्वतंत्रपणे घेता येतील आणि ते खूप फायदेशीर ठरू शकते.

वनप्लस नॉर्ड ३ 5G स्मार्टफोनमधील फीचर्स

नॉर्ड ३ 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७४ इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ९००० प्रोसेसर आणि १६ जीबी पर्यंत रॅम देण्यात आली आहे. बॅक पॅनेलमध्ये ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, ५० मेगापिक्सल मुख्य सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, जी ८० वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.

WhatsApp channel
विभाग