मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकमध्ये श्रीलंकेप्रमाणे होणार लोकांच्या असंतोषाचा उद्रेक? आर्थिक संकट व महागाईने देशात हाहाकार

पाकमध्ये श्रीलंकेप्रमाणे होणार लोकांच्या असंतोषाचा उद्रेक? आर्थिक संकट व महागाईने देशात हाहाकार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2023 02:48 PM IST

Pakistan Crisis : पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट आणखी गडद झाले असून महागाई व विजेच्या संकटाने जनता बेहाल झाली आहे. त्यामुळे तेथेही श्रीलंकेप्रमाणे लोकांच्या असंतोषाचा आगडोंब उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाक पंतप्रधान
पाक पंतप्रधान

पाकिस्तानात आर्थिक संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. कर्जाच्या खाईत बुडालेल्या पाकिस्तानमध्ये डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत खूपच कोसळली आहे. पाकिस्तानी रुपयामध्ये २४ रुपयांची घसरण झाली असून आज दुपारपर्यंत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २५५ रुपयांवर व्यवहार करत होता. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानचा खजिना दिवसेंदिवस रिकामा होत आहे. तेथील परिस्थिती श्रीलंकेप्रमाणे हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये लोकांचा असंतोष उफाळून लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. 

पैशांसाठी पाकिस्तान अन्य देशांवर अवलंबून आहे. पाकिस्तान करन्सीच्या किंमतीत घसरण होत असताना पाकची आर्थिक सिथ्ती बिघडत आहे. यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषच्या मदतनिधीसाठी कठीण शर्थी मानण्यास  तयार झाला आहे. पाकिस्तानी पीएम शहबाज शरीफ यांनी जनतेला सांगितले आहे की, सरकार ६ अब्ज अमेरिकी डॉलरच्या पॅकेजसाठी सर्व शर्थींचे पालन करण्यास तयार आहे. 

पाकिस्तानात आर्थिक संकट इतके तीव्र आहे की, लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानमध्ये पायाभूत सुविधा तर दुरची गोष्ट आटा, धान्य, पेट्रोल आणि डिझेल सारख्या जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानमध्ये महागाई २५ टक्के वाढली आहे त्याचबरोबर परदेशी भांडवलही सतत कमी होत आहे. पाकिस्तानमध्ये ४.१ अब्ज डॉलर परदेशी  भांडवल पोहोचले आहे. 

पाकिस्तानमध्ये वीजचे संकट तीव्र - 

गरीबीचे संकट झेलत असलेल्या पाकिस्तानमध्ये आता वीजेचे संकटही आ वासून उभे राहिले आहे. नुकचेच नॅशनल ग्रीड सिस्टम फेल झाल्यामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह लाहोर, कराचीसह अनेक मोठ्या शहरातील बत्ती गुल झाली आहे. दरम्यान पाकिस्तान सरकार लोकांना विश्वास देत आहे की, लवकरच विजेच्या संकटावर मात केली जाईल. मात्र जागतिक मीडियाच्या रिपोर्टनुसार वीज पुर्ववत करण्यासाठी पाकिस्तानकडे ना साधने आहेत ना पैसे. अशामुळे पाक जनतेचे अतोनात हाल होत आहे. 

 

पाकिस्तानमध्ये श्रीलंकेसारखा उद्रेक होईल?

काही महिन्यापूर्वी श्रीलंकेतही अशीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यावर तेथील जनता रस्त्यावर उतरली होती. आता पाकमध्ये आर्थिक स्थिती श्रीलंकेप्रमाणेच झाली आहे. कारण पाकिस्तान राजकीय, आर्थिक आणि सामाजिक सर्व पातळ्यांवर संकटाचा सामना करत आहे. 

IPL_Entry_Point

विभाग