RJ Simran Sing Sucide: प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  RJ Simran Sing Sucide: प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह!

RJ Simran Sing Sucide: प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह!

Dec 26, 2024 09:42 PM IST

RJ Simran Sing Death News: प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहची आत्महत्या
प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहची आत्महत्या

RJ Simran Singh Found Dead: रेडिओ जॉकी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या जम्मूतील फ्रीलान्सर सिमरन सिंह यांचा हरयाणातील गुरूग्राममध्ये राहत्या घरात मृतदेह आढळून आला. सिमरन सिंहचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तिने आत्महत्या केली, असा संशय व्यक्त केला जात आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सिमरनसोबत राहणाऱ्या एका मित्राने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासात सिमरन सिंहने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

सिमरन सिंह सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये 'जम्मू की धडकन' म्हणून ओळखली जात होती आणि इन्स्टाग्रामवर तिचे ६.८३ लाख फॉलोअर्स होते. जम्मूतील सर्वात तरुण रेडिओ जॉकी म्हणून तिला ओळखले जायचे. तिने आपल्या व्हेरिफाइड इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने एकूण ४४३ पोस्ट केल्या आहेत. त्यापैकी बहुतेक मजेशीर कंटेंट आहेत. तिने १३ डिसेंबरला शेवटची पोस्ट केली होती, ज्यात ती धडक चित्रपटाच्या गाण्यावर गाउन घालून समुद्रकिनाऱ्यावर डान्स करताना दिसली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर