मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Silicon vally bank : अमेरिकेतील जगप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅली बँक बंद, सर्व मालमत्ता जप्त; शेअर्समध्ये तब्बल ७० टक्क्यांनी घसरण

Silicon vally bank : अमेरिकेतील जगप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅली बँक बंद, सर्व मालमत्ता जप्त; शेअर्समध्ये तब्बल ७० टक्क्यांनी घसरण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 11, 2023 02:10 PM IST

Silicon Valley Bank crisis : अमेरिकेतील जगप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅली बँकेची डबघाईला आली आहे. बँकेची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली असून बँक बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आहेत.

Silicon Valley Bank crisis
Silicon Valley Bank crisis

Silicon Valley Bank: अमेरिकेतील जगप्रसिद्ध असेलल्या सिलिकॉन व्हॅली बँक आर्थिक संकटात सापडली आहे. या बँकेच्या शेअर्समध्ये एकाच दिवसांत तब्बल ७० टक्यांनी घसरण झाली आहे. ही बँक बंद करण्याचे आदेश अमेरिकन रेग्युलेटर्सकडून देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही बँक अमेरिकेतील सर्वात मोठी बँक आहे.

सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेची मालमत्ता तब्बल २१० अब्ज डॉलर्स असून ही देशातील १६ वी मोठी बँक आहे. अमेरिकेतील अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना या बँकेने भांडवल पुरवले आहे. या सोबतच ही बँक टेक स्टार्टअप्सना देखील कर्ज देत होती. मात्र, आता हीच बँक डबघाईला आल्याने अमेरिकेत बँकिंग संकट ओढवले आहे. ही बँक नियामकांद्वारे बंद करण्यात आली असून तिची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बँक बंद करण्याचे आदेश दिल्याने बँकेचे शेअर्स एका दिवसांत घसरले आहे. तब्बल ७० टक्के शेअर्स घटले आहे. याच बँकेची सहयोगी कंपनी असलेली एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपचे शेअर्स देखील ७० टक्क्यांची गडगडले आहेत. बँकेने बुधवारी २.२५ अब्ज किमतीचे शेअर्स विक्रीला काढले होते. यात यूएस ट्रेझरी आणि मॉर्टगेज बॅक्ड सिक्युरिटीज यांचा समावेश असल्याने बँकेचे मूल्य एका क्षणात ८० अब्ज डॉलर्सने कमी झाले. या घटनेचे पडसात आंतरराष्ट्रीय बाजाराव दिसत आहे. भारतीय शेअर बाजारातील समभागात देखील मोठी घसरण झाली आहे.

या बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बेलआउट देण्याची मागणी होत आहे. या बँकेच्या ग्रुपचे मुडीजने रेटिंग कमी केले आहेत. त्यामुळे या बँकेवर ओढवलेल्या आर्थिक संकटाला लेहमन ब्रदर्स आणि एन्रॉन कॉर्पोरेशनसारखे संबोधल्या जात आहे.

WhatsApp channel

विभाग