मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  High Court News : महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या मिळणार सुट्ट्या, उच्च न्यायालयाची घोषणा

High Court News : महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या मिळणार सुट्ट्या, उच्च न्यायालयाची घोषणा

May 29, 2024 08:19 PM IST

menstrual leave for women : हायकोर्ट रजिस्ट्रीमध्ये महिला कर्मचारी आता एका महिन्यात २ ते ३ दिवस मासिक धर्म सुट्टीचा लाभ घेऊ शकते.

महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या मिळणार सुट्ट्या,
महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या मिळणार सुट्ट्या,

सिक्किम हायकोर्टाने (Sikkim high court) महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या सुट्ट्या देण्याची घोषणा केली आहे. न्यायालयाचा हा निकाल मासिक धर्म स्वच्छता दिवसाच्या पूर्व संध्येला आला असून खूपच कौतुकास्पद असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बिस्वनाथ सोमद्दर यांची मंजुरी मिळाल्यानंतर याचे मंगळवारी नोटिफिकेशन जारी केले गेले. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना महिन्यात २ ते ३ दिवसांची मासिक पाळी दरम्यान सुट्टी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

हिमालयीन पर्वत रागांतील सिक्किम एक छोटे राज्य आहे. हे राज्य विद्यार्थिनींचे आरोग्य व स्वच्छतेमध्ये अव्वल आहे. त्याचबरोबर महिलांना सशक्त बनवणे तसेच IVF च्या माध्यमातून निःसंतान दाम्पत्यांना मुले जन्माला घालण्यासाठी मदतीत पुढे आहे. 

सिक्किम उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल प्रज्वल खातीवाडा यांच्याकडून जारी झालेल्या अधिसूचनेनुसार हायकोर्ट रजिस्ट्रीमध्ये महिला कर्मचारी आता एका महिन्यात २ ते ३ दिवस मासिक धर्म सुट्टीचा लाभ घेऊ शकते. मात्र यासाठी त्यांना आधी एचसीशी संबंधित मेडिकल ऑफिसरशी संपर्क करावा लागेल. त्यानंतर अशा सुट्टीसाठी शिफारस पत्र घ्यावे लागणार आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, अशी सुट्टी घेतल्यानंतर तुमच्या अन्य सुट्ट्यांवर याचा परिणाम होणार नाही.

न्यायालयाच्या निकालावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया –

न्यायालयाच्या या निकालावर सोशल मीडियावर याच्या खूप चर्चा होत आहेत. यावरून खूप प्रतिक्रिया येत आहेत. अधिकांश लोकांनी न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत केले आहे. एका यूजरने म्हटले की, महिला कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला २ ते ३ दिवस मासिक धर्म सुट्टी मिळेल. अशा प्रकारच्या सुट्टीचे महत्व समजल्याबद्दल सिक्किम हायकोर्टाचे अभिनंदन. अन्य एका यूजरने लिहिले की, हा निर्णय पूर्णपणे चांगला नाही, अर्धाच चांगला आहे. अखेर कोणतीही महिला या सुट्टीसाठी स्वयं प्रमाणित का करू शकत नाही. अखेर येथे एखाद्या डॉक्टरची गरज का आहे. 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग