Viral News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी बरीच टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका महिला भिकाऱ्याला कंडोम देत असल्याचं दिसत आहे. ही व्यक्ती पेशाने डॉक्टर असल्याचं सांगण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'रस्त्याच्या कडेला भिकाऱ्यांना मदत करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. आता या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीवर टीका केली आहे. लोकांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, हे अतिशय लज्जास्पद आहे.
दुर्योधन असे या डॉक्टर व्यक्तीचं नाव असून त्याच्या एक्सच्या बायोमध्ये डॉक्टर लिहिलं आहे. तर त्यांच्या हँडलवर डॉ. सौरव सिंह असं नाव आहे. ३१ ऑक्टोबरला पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो पायऱ्या चढताना दिसत असून त्याच्या हातात कंडोमचे रॅपर आहे. तो पायऱ्या चढून वर जातो आणि कंडोम रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका महिला भिकाऱ्याच्या हातात कंडोमचं पाकीट देत असतांना दिसत आहे. व्हिडिओमध्ये महिला भिकाऱ्याला कंडोम देत तो म्हणतो, 'आता हेच ठेवा; कारण हेच कामी येणार आहे'. आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी तिथे एक लहान मुलगाही बसला असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. भिकारी महिलेचा हा मुलगा त्याच्या आईला काय मिळालं आहे हे पाण्यासाठी धावला.
या व्हिडिओतर डॉक्टरं अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. त्यांन महिला भिकाऱ्याला उद्देशून म्हटलं की, जर तुमच्यात शिकवण्याची आणि मुलांना खायला घालण्याची शक्ति नसेल तर मुलांना जन्म घालू नका. मात्र, हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी या डॉक्टरवर टीका केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने असा व्हिडिओ शेअर करणे अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. एका व्यक्तीनं लिहिलं की, 'तुला काय झालं?' दुसऱ्याने लिहिले की, अत्यंत खालचा आणि असंवेदनशील व्हिडिओ पोस्ट करतांना लाज वाटली नाही का?
एक्स युजर कौशिक चॅटर्जी यांनी लिहिलंन की, हे खूप वाईट आणि चुकीचं आहे. तू तिच्या दु:खाचा व्हिडिओ बनवलास. तुम्ही त्या महिलेच्या परवानगीशिवाय तो पोस्ट केला. एक डॉक्टर किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्हाला हे अतिशय लाजिरवाणे वाटत नाही का? त्यानं पुढं लिहिलं की, हे सर्वांसाठी लाजिरवाणे आहे. परंतु डॉक्टर म्हणून आपण हे केले, त्यामुळे हे खूप निराशाजनक आहे. सहानुभूतीचा व्हिडिओ असता तर चाललं असतं. पण, तुमचा हेतू चुकीचा होता. पण ज्या प्रकारे तुम्ही लाजिरवाणे कृत्य केलं त्यावरून तुमच्यात सहानुभूतीचा अभाव दिसून येतो," असं व्हिडिओखाली आणखी एका कमेंटमध्ये म्हटलं आहे, ज्याला एक्सवर हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.