नवरा-बायको मोठमोठ्या हॉटेलांत जायचे, भरपेट खायचे; पण पैसे मागायची हिंमत मालकही करायचा नाही! असं करायचे काय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नवरा-बायको मोठमोठ्या हॉटेलांत जायचे, भरपेट खायचे; पण पैसे मागायची हिंमत मालकही करायचा नाही! असं करायचे काय?

नवरा-बायको मोठमोठ्या हॉटेलांत जायचे, भरपेट खायचे; पण पैसे मागायची हिंमत मालकही करायचा नाही! असं करायचे काय?

Updated Jun 25, 2024 04:02 PM IST

Viral News: रेस्टॉरंटमध्ये फुकटात जेवण्यासाठी एका जोडप्याने अशी शक्कल लढवली की, ते ऐकल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकीत झाले.

रेस्टॉरंटमध्ये फुकटात जेवण्यासाठी जोडप्यानं लढवली भन्नाट शक्कल
रेस्टॉरंटमध्ये फुकटात जेवण्यासाठी जोडप्यानं लढवली भन्नाट शक्कल (Unsplash)

Restaurants Shocking Story: उदित भंडारी या एक्स युजरने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर एका मध्यमवयीन जोडप्याची कहाणी शेअर केली आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर बिल न भरण्यासाठी हे दाम्पत्य काय करतात? हे त्यांनी सांगितले. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भंडारी यांनी लिहिले की, “एका पार्टीत एका मध्यमवयीन जोडप्याला भेटलो, ज्याने अत्यंत घृणास्पद गोष्ट उघड केली. ते मौजमजेसाठी काहीतरी करतात. कारण, फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाताना ते अनेकदा सोबत मृत माशी घेऊन जातात.” ते पुढे म्हणाले की, “ रेस्टॉरंटमध्ये पोटभर जेवल्यानंतर गुपचूप जेवणामध्ये मृत माशी टाकायचे आणि प्रचंड गदारोळ करायचे. त्यांना शांत करण्यासाठी रेस्टॉरंट मालक त्यांच्याकडून जेवणाचे पैसे घेत नसे.  असे त्यांनी अनेक रेस्टॉरंटमध्ये केले आहे.”

ही पोस्ट आज (२५ जून २०२४) रोजी शेअर करण्यात आली. या पोस्टला आतापर्यंत जवळपास दोन हजार व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टवर विविध कमेंट्सही आल्या आहेत. या जोडप्याने फुकटात जेवण्यासाठी लढवलेली शक्कलबाबत ऐकून अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका व्यक्तीने लिहिले, "हो! भारतात फाइव्ह स्टार रेस्टॉरंट्स तितके महागही नाहीत. अभिषेक भारद्वाज नावाच्या आणखी एका एक्स युजरने म्हटले आहे की, "मला आनंद आहे की, मी त्यांच्यासारखा कोणीही भेटलो नाही. मला असे वाटले की, अशा प्रकारचे लोक फक्त रील लाइफमध्ये अस्तित्वात आहेत, वास्तविक नाहीत. आपण आपले वर्तुळ आणि आपल्याला भेटणारी माणसे फिल्टर करण्यास सुरवात केली पाहिजे."

आणखी एका जणाने म्हटले आहे की, "माझा भाऊ खूप पूर्वी एमसीडीमध्ये पार्ट टाईम काम करायचा. ते म्हणाले की, अनेक विशेषाधिकारप्राप्त लोक एमसीडीमध्ये येतात, पोटभर जेवतात आणि शेवटी भाज्यांबद्दल तक्रारी करतात किंवा दुसरी भाजी ऑर्डर करतात. चौथ्या युजरने म्हटले की, “घृणास्पद, दयनीय, म्हणजे चोरी आणि फसवणूक, त्यांचे संगोपन दर्शवते.”

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर