Donald Trump : इराणने रचला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट! खतरनाक किलरला दिली होती सुपारी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Donald Trump : इराणने रचला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट! खतरनाक किलरला दिली होती सुपारी

Donald Trump : इराणने रचला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट! खतरनाक किलरला दिली होती सुपारी

Nov 09, 2024 09:24 AM IST

Iran plan to kill Donald Trump : इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला होता. मॅनहॅटनच्या फेडरल कोर्टात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारीनुसार ही माहिती समोर आली आहे.

इराणने रचला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट! खतरनाक किलरला दिली होती सुपारी
इराणने रचला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट! खतरनाक किलरला दिली होती सुपारी (REUTERS)

Iran plan to kill Donald Trump : इराणने अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचं उघड झालं आहे.  मॅनहॅटनच्या फेडरल कोर्टात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारीनुसार ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार इराणच्या लष्करी रिव्होल्युशनरी गार्डच्या एका अधिकाऱ्याने ट्रम्प यांच्यावर पाळत  ठेवण्याची व  त्यांची हत्या करण्याची जबाबदारी फरहाद शाकिरी नावाच्या किलरला दिली असल्याचं तपसात पुढं आलं आहे.  

इराणने ही योजना सप्टेंबरमध्ये आखली होती आणि आठवडाभरात ती अंमलात आणली जणार होती.  ट्रम्प यांच्या हत्येच्या कटात न्यूयॉर्कचे दोन नागरिक देखील सामील झाले होते. सप्टेंबरमध्ये हा कट यशस्वी झाला नाही तर अमेरिकेच्या निवडणुका संपेपर्यंत वाट पाहावी लागेल, असेही फरहादला सांगण्यात आलं होतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पराभूत होतील, असे इराणला वाटत होते. अशा परिस्थितीत ट्रम्प यांना फारशी सुरक्षा राहणार नाही आणि त्यांना ठार मारणे सोपे जाईल, असे देखील इराणला वाटत होते. 

तक्रारीनुसार, शाकिरीने एफबीआयला सांगितले की, इराणच्या एका अधिकाऱ्याने त्याला सात दिवसांच्या आत हत्येचा कट रचण्यासाठी सुपारी दिली होती. पण त्यावेळी त्याने प्लॅनिंग केले नाही. ट्रम्प यांच्या हत्येचा कट त्यांच्या विजयानंतर काही दिवसांतच उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोनवेळा जीवघेणा हल्ला झाला आहे.  या हल्ल्यांमध्ये ट्रम्प थोडक्यात बचावले होते.

फरहादसोबत न्यूयॉर्कचे दोन रहिवासी जोनाथन लॉधोल्ट (वय ३६)  आणि  कार्लिस्ले रिवेरा (वय ४९) होते. याशिवाय अमेरिकेत राहणारे दोन ज्यू व्यापारी आणि इराणी-अमेरिकन नागरीकाचाही या कटात सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे. ५१ वर्षीय फरहाद शाकिरी हा मूळचा अफगाणी आहेत. दरोड्याच्या गुन्ह्यात १४ वर्षे अमेरिकेच्या तुरुंगात काढल्यानंतर २००८ मध्ये त्याला हद्दपार करण्यात आलं होतं. नंतर तो इराणी सैन्यात दाखल झाला. रिवेरा आणि जोनाथन यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाने दिली आहे. त्याचबरोबर इराणमध्ये शाकिरी अजूनही मोकळा फिरत आहे.

ट्रम्प यांना मारण्याचं इराणने का केलं प्लॅनिंग ?
इराणचे मेजर जनरल आणि कुद्स फोर्सचे कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला इराणला डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करून घ्यायचा आहे. सत्तेत आल्यानंतरही ट्रम्प यांनी इराणबाबत आपले धोरण स्पष्ट केलं  आहे. त्यामुळे इराणला ट्रम्प यांची हत्या करायची आहे.  

कोण आहे  फरहाद शकीरी ? 

मिळालेल्या माहितीनुसार, शाकिरी हा तरुण म्हणून अमेरिकेत आला होता. तो कोणत्या वर्षी अमेरिकेत आला हे एफबीआयने सांगितले नाही. शाकिरी यांनी अमेरिकेच्या तुरुंगात या प्रकरणात सहभागी असलेल्या काही सूत्रधारांची भेट घेतली. १९९४ मध्ये दोषी ठरल्यानंतर वुडबोर्न करेक्शनल सेंटरसह अनेक राज्यांच्या तुरुंगात त्याला ठेवण्यात आल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. २००५  मध्ये शाकिरीची दुसऱ्या तुरुंगात बदली झाली, जिथे तो रिव्हेराला पहिल्यांदा भेटला. २००८ मध्ये अमेरिकेतून हकालपट्टी होईपर्यंत शाकिरी हा अमेरिकेतच होता. न्यूयॉर्क डिपार्टमेंट ऑफ करेक्शन्स अँड कम्युनिटी मॉनिटरिंगच्या नोंदीनुसार, २०१५  मध्ये त्याचे पॅरोल मॉनिटरिंग संपले. मात्र, चार वर्षांनंतर ९२ किलो हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी त्याला पुन्हा श्रीलंकेत अटक करण्यात आली.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर