मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime News : युवतीला दोन लाखांना विकून जबरदस्तीनं लावलं लग्न; ओलीस ठेवत दोन महिने केला अत्याचार

Crime News : युवतीला दोन लाखांना विकून जबरदस्तीनं लावलं लग्न; ओलीस ठेवत दोन महिने केला अत्याचार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 11, 2022 11:20 AM IST

Crime News Today : बलात्कार करण्याआधी पिडितेला दोन लाखांना विकण्यात आलं होतं, त्यानंतर बळजबरीनं तिचं लग्न लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

Haridwar Crime News Today
Haridwar Crime News Today (HT_PRINT)

Haridwar Crime News Today : दिल्लीलगत असलेल्या गाझीयाबादमधील हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आता उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीला दोन लाखांना विकून तिचं बळजबरीनं लग्न लावून तिच्यावर दोन महिने सतत बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. गेल्या मार्च महिन्यापासून या प्रकरणात पिडितेची तक्रार पोलीस नोंदवत नव्हते, त्यानंतर पिडितेनं डेहराडून गाढत डीआयजींकडे तक्रार दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

हरिद्वारच्या सिडकुल परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिडित तरुणी ही मूळ बिहारच्या रोहतास जिल्ह्यातली असून ती नोकरीच्या शोधात हरिद्वारमध्ये आली होती. हरिद्वारच्या सिडकुल परिसरात ती भाड्यानं राहत होती, तिच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीनं तिला फिरण्यासाठी नेतो असं सांगत तिला मित्रासोबत एका कारमध्ये बसवून उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये आणलं. त्यानंतर आरोपींनी मुलीला नीतू गुर्जर या व्यक्तीस दोन लाखांना विकलं. त्यानंतर मुलीला खरेदी केलेल्या व्यक्तीनं तिच्यासोबत जबरदस्तीनं लग्न केलं असून गेले दोन महिने तो तिच्यावर बलात्कार करत असल्याची तक्रार पिडितेनं सुटका केल्यानंतर पोलिसांकडे केली आहे.

सहारनपूरमधून कशीबशी सुटका करून आल्यानंतर पिडितेनं हरिद्वारच्या सिदुकल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस तिची तक्रार नोंदवून घेत नव्हते. अखेर पिडितेनं थेट डेहराडून गाठून घडलेला सर्व प्रकार हा डिआयजींना सांगितला. त्यानंतर डीआयजींनी दिलेल्या आदेशानंतर सिडकुल आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग