Viral News : प्रेमात विश्वासघात केल्याने एका तरुणीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भयंकर शिक्षा दिली आहे. ऐवढेच नाही तर तिच्या या कृत्याचे बळी मित्राचे चार मित्रदेखील ठरले आहेत. तरुणीने केलेल्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. या तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडची हत्या तर केलीच, शिवाय त्याच्यासोबत त्याच्या आणखी चार मित्रांची देखील हत्या केली. मुलाची चूक एवढीच होती की त्याने मुलीशी ब्रेकअप करून नवीन गर्लफ्रेंड बनवली होती. यानंतर सूडाच्या आगीत होरपळत असलेल्या मुलीने अत्यंत क्रूर पद्धतीने नियोजन करून हे हत्याकांड घडवून आणले.
सुडाने पेटलेल्या तरुणीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला विषारी 'पेपर सूप' प्यायला दिले. यावेळी त्याच्यासोबत काही मित्रही होते. सर्वांनी मिळून हे सूप शेअर केले. बराच वेळ हे पाच जण घरी परतले नसल्याने त्यांना शोधण्यासाठी त्यांचे कुटुंबीय बाहेर पडले. ज्या घरात ही मुले गेली होती, त्या घरात हे लोक गेले असता तिथले दृश्य पाहून सर्वजण हादरले. त्यांना पाचही जण मृतावस्थेत पडलेले दिसले.
ही घटना नायजेरियातील आहे. येथे एका मुलीचे एका मुलांशी प्रेमसंबंध होते, पण नंतर मुलाने तिच्याशी ब्रेकअप करत दुसऱ्या मुलीला गर्लफ्रेंड बनवले. यामुळे पहिल्या गर्लफ्रेंडला याचा खूप राग आला होता. आपल्या एक्स बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी त्याने मुलाला व त्याच्या काही मित्रांसोबत पारंपरिक मिरपूड सूप प्यायला बोलावले. तिचा हेतू फक्त तिच्या प्रियकराची हत्या करण्याचा होता, असे म्हटले जाते. पण त्याने हे विषारी सूप त्याच्या सोबत त्याच्या इतर मित्रांशी देखील शेअर केले. यानंतर पाचही जणांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी मुलीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एडो स्टेट पोलिस कमांडचे प्रवक्ते मोझेस यामू यांनी सांगितले की, अधिकारी ही हत्या कशी केली याच शोध घेत आहेत. तसेच यामागचे नेमके कारण काय याचा देखील शोध घेतला जात आहे.
या प्रकरणात मुलीची बाजूही समोर आली आहे. १७ वर्षीय तरुणीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. घटनेच्या दिवशी ती शहरात नव्हती आणि जनरेटरच्या धुरामुळे या पाच जणांचा मृत्यू झाल्याचे तिचं म्हणणे आहे. त्याचवेळी हत्या झालेल्या प्रियकराच्या वडिलांनी पोलिसांना अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे मुलीवरील संशय अधिक वाढला आहे. वडिलांचे म्हणणे आहे की, काही दिवसांंपूर्वी मुलाची नवीन गर्लफ्रेंड एक्स गर्लफ्रेंडसमोर आली होती. त्यानंतर एक्स गर्लफ्रेंडने मुलाच्या नव्या गर्लफ्रेंडमध्ये मोठा वाद झाला. या वादातून दोघींनी एकमेकींचे कपडे फाडले होते. यामुळे या घटनेत मुलीचा सहभाग असल्याचा संशय वाढला आहे.