धीरज साहू भाजपमध्ये गेले तर लगेच स्वच्छ होतील; खासदार प्रियांका चतुर्वेदींचा अमित शाहांना टोला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धीरज साहू भाजपमध्ये गेले तर लगेच स्वच्छ होतील; खासदार प्रियांका चतुर्वेदींचा अमित शाहांना टोला

धीरज साहू भाजपमध्ये गेले तर लगेच स्वच्छ होतील; खासदार प्रियांका चतुर्वेदींचा अमित शाहांना टोला

Published Dec 11, 2023 04:56 PM IST

Priyanka Chaturvedi on Dheeraj Sahu : धीरज साहू यांच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीवर टीका करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Amit Shah- Priyanka Chaturvedi
Amit Shah- Priyanka Chaturvedi

Priyanka Chaturvedi reply to Amit Shah : काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरात ३५३ कोटींची रोकड सापडल्यानं संपूर्ण देश चकीत झाला आहे. साहू हे काँग्रेसचे खासदार असल्यानं भाजपनं आयतीच संधी साधत पुन्हा एकदा काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काँग्रेसच्या आडून भाजपनं इंडिया आघाडीवरही हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साहू प्रकरणावरून इंडिया आघाडीला लक्ष्य केलं होतं. 'साहूंच्या भ्रष्टाचारावर काँग्रेसनं गप्प बसणं साहजिक आहे. कारण, भ्रष्टाचार ही त्यांची प्रवृत्ती आहे. मात्र, जेडीयू, आरजेडी, द्रमुक आणि सपा हे सगळे गप्प बसले आहेत. पंतप्रधान मोदी हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची मोहीम या लोकांनी का चालवली हे आता पुढं येतंय. भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची भीती त्यांना आहे, असं शाह म्हणाले होते.

Article 370 Verdict: जम्मू- काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

प्रियांका चतुर्वेदी यांनी शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 'साहू यांच्यासोबत उभं राहणं म्हणजे त्यांच्या कृतीचं समर्थन करणं असं होत नाही. भाजप आरोप करण्याची संधीच शोधत असतो. सगळे विरोधी पक्ष साहू यांच्या पाठीशी आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. साहू हे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांचा दोष पक्षाला देणं चुकीचं आहे, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.

'साहू हे भाजपमध्ये सहभागी झाले तर ते लगेच स्वच्छ होतील. मोदींच्या वॉशिंग मशीनमधून त्यांना काढलं जाईल आणि सर्व आरोपांपासून त्यांना मुक्त केलं जाईल, असा टोला चतुर्वेदी यांनी हाणला.

साहूंच्या घरात पैशांचा पर्वत

धीरज साहू यांच्या घरी ६ डिसेंबर रोजी सर्वप्रथम इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला होता. त्यांच्याकडं बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचं लक्षात येताच ईडी आणि सीबीआयनं देखील विविध ठिकाणी छापे टाकले. साहू यांच्या घरात अक्षरश: नोटांचे ढीग सापडले. १७६ बॅगा पैशांनी भरलेल्या होत्या. त्यात एकूण ३५३ कोटी रुपये होते. तीन बँकांचे ८० कर्मचारी या पैशाची मोजदाद करत होते. तब्बल ५ दिवसांनंतर नोटांची मोजणी पूर्ण झाली. तपास यंत्रणांना आतापर्यंतच्या धाडीत मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर