sheikh hasina news : बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार वाढल्याने लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान शेख हसिना यांना राजीनामा देण्यास सांगून त्यांना ४५ मिनिटांत देश सोडून देण्यास सांगितले होते. यानंतर हसिना या भारतात आल्या होत्या. दरम्यान, त्या आता पुन्हा कधी बांगलादेशात परतणार नाहीत. तसेच त्या सक्रिय राजकारणात राहणार नाहीत व त्या युकेला स्थायिक होणार असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, या सर्व अफवा असल्याचं शेख हसिना यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय याने स्पष्ट केलं आहे.
हसिना यांनी अमेरिका किंवा युनायटेड किंग्डममध्ये जाण्याबद्दल कोणातही निर्णय घेतलेला नाही आणि या सर्व अफवा असल्याचं वृत्त डेली स्टारने दिले आहे. शेख हसीना सध्या काही दिवस दिल्लीत राहणार असल्याचं देखील सजीब वाझेद जॉय यांनी म्हटलं आहे.
बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी कोटा पद्धत संपुष्टात आणावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिला. लष्कर प्रमुखांनी त्यांना ४५ मिनिटांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर त्या एका लष्करी विमानाने भारतात दाखल झाल्या होत्या.
जॉय यांनी डयूचेस वेल यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्या बांगलादेश सोडत असल्याने चिंतित नव्हत्या तर हसिना यांना बांगलादेश सोडण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांना काळजी वाटत होती. हसिना या यूएस आणि यूकेमध्ये आश्रय घेणार असल्याचं बातम्या या सर्व अफवा आहेत. हसिना यांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या त्या काही दिवस दिल्लीत राहणार आहेत असे देखील जॉय म्हणाले.
जॉय म्हणाले, हसिना या बांगलादेश सोडत असल्याने म्हणून मला काळजी वाटली नाही, तर त्यांना बांगलादेश सोडण्याची इच्छा नव्हती म्हणून काळजी वाटत होती. आम्ही तिची समजूत घातली. मी म्हणालो की ही आता राजकीय चळवळ नाही, तर हिंसक जमाव आहे... ते मारणार आहेत, त्यामुळे देश सोडणे हा पर्याय आहे.'
हसीना यांचा मुलगा जॉय याने बुधवारी एका मुलाखतीत पत्रकार डयूयचे वेले यांना सांगितले की शेख हसिना राजीनामा देणार याचा निर्णय एक दिवस आधी घेण्यात आला होता . परंतु त्याची घोषणा करण्यात आली नव्हती. ही बाब फक्त काही जणांना माहिती होती. सर्व बाबी या राज्यघटनेनुसार व्हाव्या अशी त्यांची योजना होती. पण जेव्हा आंदोलक पंतप्रधान भवनाकडे कूच करू लागले, तेव्हा आम्ही घाबरून म्हणालो, आता तुम्हाला निघायला वेळ नाही."
ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, अवामी लीगमधील नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जॉय म्हणाले की, राजकारणात प्रवेश करण्याचा त्यांचा सध्या कोणताही विचार नाही. तिसऱ्यांदा आमच्या कुटुंबाला सत्तापालटाचा सामना करावा लागला. तिसऱ्यांदा आम्हाला सर्वस्व गमावून परदेशात राहावे लागले. माझी आई आणि मी सोडले तर आम्ही सर्वजण बराच काळ परदेशात राहिलो आहोत. आम्ही इथेच स्थायिक आहोत. आम्हाला येथे कोणतीही अडचण नाही, आम्हाला येथे राहण्याची सवय आहे,” जॉय म्हणाले.
जॉय पुढे म्हणाले की, हसीनाचा भारतातून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा कोणताही निर्णय नाही. शेख हसीना या बऱ्या आहेत आणि सध्या त्या दिल्लीत आहेत. माझी बहीण तिच्यासोबत आहे. माझी बहीण दिल्लीत राहते. हसिना या बऱ्या असल्या तरी खूप अस्वस्थ आहे असे जॉय म्हणाले. माझ्या वडिलांनी देशासाठी जीव दिला, परंतु संपूर्ण कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला याचे आईला दुःख आहे.