Bangladesh News : बांग्लादेशात मोठा हिंसाचार उफाळला असून सरकारी नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाविरोधातील आंदोलन हिंसक झाले आहे. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर, सोमवारी शेख हसिना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी देशातून पलायन कर भारतात आश्रय घेतला आहे. दरम्यान, त्यांनी राजकारणाला कायमचा रामराम केला असल्याचे त्यांचा मुलगा व माजी राजकीय सल्लागार शाजेब वाजेद जॉय यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. सध्या हसीना लंडनला जण्यापूर्वी भारतात पोहोचल्या आहेत. त्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बीबीसीशी बोलताना जॉय यांनी हसीना आता राजकारणात पुन्हा येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी राजकरणाला कायमचा रामराम केल्याचं देखील त्या म्हणाल्या. जॉय म्हणाले, शेख हसीना या अत्यंत निराश झाल्या आहेत. त्यांनी देशात बदल घडवून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, तरीसुद्धा त्यांच्याविरोधात आंदोलन चालूच आहे. सरकारविरोधातील लोकांच्या टोकाच्या रोषामुळे त्यांनी निराश होऊन पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय घेतला.
जॉय म्हणले, शेख हसिना यांनी बांग्लादेशची परिस्थिती बदलली. त्या सत्तेवर आल्या तेव्हा बांग्लादेश हा मागास व गरीब देश होता. मात्र, आज बांग्लादेश आशिया खंडातील एक विकसनशील देश म्हणून हसीना यांच्या नेतृत्वात उदयास येत होता. देशासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले तरी काही मोजक्या लोकांनी सरकारविरोधात बंड केलं. त्याला देशातील जनता बळी पडली. त्यामुळे शेख हसिना आता पुन्हा बांगलादेशात परतनार नाहीत शेख हसिना यांनी देश सांभाळल्यावर अनेक मोठे बदल घडवून आणले. .
एनडीटीव्हीशी बोलताना जॉय म्हणाला, 'मी त्याच्याशी सकाळी बोललो आहे. बांगलादेशात अराजकता पसरलेली आहे. यामुळे त्या खूप निराश आहे. हे त्यांच्यासाठी खूप दु:खद आहे, कारण तिला बांगलादेशला विकसित देश करायचे होते. यासाठी गेल्या १५ वर्षांपासून त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी देशाला अतिरेकी आणि दहशतवादापासून सुरक्षित ठेवले आणि एवढे करूनही अल्पसंख्याक, विरोधक आणि अतिरेक्यांनी सत्ता मिळवली.
जॉय म्हणाले, 'आम्हाला आशा आहे की बांग्लादेशात निवडणुका होतील, पण यावेळी आमच्या पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. मला वाटत नाही की निवडणुका किती निष्पक्ष होतील. एक प्रकारे पाहिले तर ही आता कौटुंबिक समस्या राहिलेली नाही. आपण काय करू शकतो हे दाखवून दिले आहे. आपण बांगलादेशचा किती विकास करू शकतो हे आपण दाखवून दिले आहे आणि जरबांग्लादेशच्या लोकांना उभे राहायचे नसेल आणि त्यांना या हिंसक अल्पसंख्याकांना पाठिंबा द्यायचा असेल, तर लोकांना योग्य नेतृत्व मिळाले आहे, असे जॉय म्हणाले.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, बांग्लादेशात सरकारविरोधी मोठ्या प्रमाणात निदर्शने झाल्यानंतर सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणाऱ्या शेख हसीना यांचे विमान लंडनला जाण्याच्या त्यांच्या योजनेचा एक भाग म्हणून गाझियाबादमधील एका विमानतळावर उतरले. बांगलादेश हवाई दलाच्या C-130J मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमधून हसीना भारतात आल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी हसीना यांचे विमान एअरबेसवर उतरल्यानंतर काही वेळातच त्यांची भेट घेतली. बांगलादेशातील घडामोडींवर भारताच्या भूमिकेची माहिती हसीना यांना देण्यात आल्याचे समजते.
बांग्लादेशातील घडामोडींवर भारताने अद्याप भाष्य केलेले नाही. अशी अपेक्षा आहे की परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर शेजारील देशातील परिस्थितीवर आज मंगळवारी संसदेत निवेदन देणार आहेत. शेख हसीनाला सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. हसीना लंडनला जाण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.