मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Adani चा बचाव केल्याप्रकरणी शरद पवारांचे स्पष्टीकरण, सांगितलं JPC चौकशीची का नाही गरज?

Adani चा बचाव केल्याप्रकरणी शरद पवारांचे स्पष्टीकरण, सांगितलं JPC चौकशीची का नाही गरज?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 08, 2023 06:33 PM IST

Sharadpawar on adani JPC investigation : शरद पवार म्हणाले की, माझाइंटरव्यू अदानींविषयी नव्हता अन्यही काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत. ज्याचे गांभीर्य समजणे आवश्यक आहे.

शरद पवार
शरद पवार

Sharad Pawar On Adani : गौतम अडानी (Gautam Adani यांचा बचाव केल्याप्रकरणी एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांनी सांगितले की, मुलाखतीत मला अदानींबाबत काही प्रश्न विचारले गेले. जेपीसी (JPC)ची चौकशी करू नये. कारण जेपीसीच्या माध्यमातून निष्पक्षपणे चौकशी केली जाणार नाही. माझी मुलाखत अदानींवर नव्हती. मला वाटते की, याला अनावश्यक महत्व दिले जात आहे. आज देशात महागाई, शेतकरी समस्या आणि भ्रष्टाचारासारखे महत्वाचे मुद्दे आहेत. शरद पवार म्हणाले की, एक जमाना होता जेव्हा सत्ताधाऱ्यांवर टीका करायची असल्यास आम्ही टाटा-बिर्ला यांचे नाव घेत होतो. टाटांचे देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. आज अंबानी-अदानी यांचे नाव घेतले जाते. त्यांचे देशासाठी काय योगदान आहे, याचा विचार करण्याची गरज आहे.

जेपीसी चौकशीबाबत पवारांचा विरोध का?

एनसीपी चीफ शरद पवार यांनी म्हटले की,जेपीसी चौकशीची मागणी आमच्या सहयोगी पक्षांनी केली आहे. मात्र आम्हाला वाटते की, संसुक्त संसदीय समिती (JPC) मध्ये २१ पैकी १५सदस्य सत्ताधारी पक्षातील असतील. ज्या समितीत सर्वाधिक लोक सत्ताधारी पक्षातील असतील तेथे देशासमोर सत्य परिस्थिती कशी येईल.जेपीसीमध्ये ७० टक्के लोक सरकारमधील असतील. त्यामुळे जेपीसीच्या रिपोर्टमध्ये जे निष्कर्ष असतील त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. त्याऐवजी सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशाच्या नेतृत्वात समिती स्थापन करून चौकशी केल्यास चांगले होईल.

शरद पवार यांनी म्हटले की, कोणी नॉट रिचेबल आहे हे तुम्ही कसे म्हणू शकता?होऊ शकतो ती व्यक्ती घरात असेल.अशी कोणतीही स्थिती नाही. अजित पवार माझ्या संपर्कात आहेत. शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी बोलल्या होत्या. त्यानंतर याचा अर्थ काढला गेला की, ते अदानींचे कौतुक करत आहेत.

दरम्यान या मुद्यावर बोलताना आता शरद पवार म्हणाले की, माझा इंटरव्यू अदानींविषयी नव्हता अन्यही काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत. ज्याचे गांभीर्य समजणे आवश्यक आहे.

IPL_Entry_Point