मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पुढं आले शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद, हिंदूबाबत केलं मोठं वक्तव्य

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पुढं आले शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद, हिंदूबाबत केलं मोठं वक्तव्य

Jul 08, 2024 07:29 PM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या हिंदूंबाबत केलेल्या विधानावरून गदारोळ माजला असताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पुढं आले शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पुढं आले शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद

ज्योतिर मठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'हिंदुत्व’ बाबत विधानाचे समर्थन केले आहे. काही दिवसापूर्वी लोकसभेत आक्रमक भाषण करताना राहुल गांधींनी भाजप नेत्यांवर तुफान हल्ला चढवला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना राहुल गांधींनी भाजप नेत्यांवर सांप्रदायिक द्वेष पसरवून समाजात फूट पाडण्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधींच्या भाषणाचा निषेध केला. मोदींनी म्हटले की, राहुल गांधींनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटले आहे. यावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी वादग्रस्त विधाने रेकॉर्डवरून हटवली होती.

मात्र आता शंकराचार्य राहुल गांधींच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. हिंदू समाजात शंकराचार्यांना विशेष सन्मान आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले की, आम्ही राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषण ऐकले आहे. त्यांनी स्पष्टपणे व जोर देऊन म्हटले की, हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये शंकराचार्य राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग प्रसारित करण्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यांनी म्हटले की,'राहुल गांधी यांच्या भाषणातील केवळ काही अंश शेअर करणे अनैतिक आहे. यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई केली पाहिजे.

ट्रेंडिंग न्यूज

wagh nakh : महायुती सरकार जी वाघनखं आणणार आहे, ती शिवरायांनी वापरल्याचा कुठलाही पुरावा नाही; लंडनमधून आलं पत्र
 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनी भावावर लावलेल्या आरोपांचा बचाव केला आहे. त्यांनी म्हटले की, राहुल कधीही हिंदुविरोधात बोलू शकत नाहीत. त्यांची टिप्पणी भाजप व त्यांच्या नेत्यांवर होती. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आरोप केला होता की, राहुल यांनी सभागृहात हिंदुंचा अपमान करत त्यांना हिंसक म्हटले आहे.

हे काम ठरवून केलेले षड्यंत्र आहे. यामुळे हिंदू समाजालाही आता यावर विचार करावा लागेल. हिंदु समाजाला हिंसक म्हणणं गंभीर गोष्ट आहे. हिंदूविरोधात कोठा कट असल्याचे वाटते. हिंदुंना हिंसक म्हटले जात आहे. त्यांना अपमानित केले जात आहे, शिव्या दिल्या जात आहे. हिंदुंना शिव्या देण्याचे प्रथा सुरू केली जात आहे. आता हिंदू लोकांनाही विचार करावा लागेल.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर